शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

सेंद्रिय खतासाठी मेंढ्यांचा वापर

By admin | Updated: June 2, 2014 01:45 IST

वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत.

रहाटणी : वेगवान नागरीकरणामुळे शहराच्या आजूबाजूच्या गावातील शेती नाहीशी होऊन येथे मोठमोठ्या इमारती उभ्या रहात आहेत. मात्र काही शेतकरी आपल्या जमिनी राखून आहेत. ते आजही हंगामाप्रमाणे पिके घेत आहेत. शेतकरी जमिनीला सुपीक करण्यासाठी अनेक क्लृप्त्या वापरत आहेत. त्यातच जमिनीची पोत वाढविण्यासाठी शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. ही परंपरागत पद्धत कायम असल्याचे रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात दिसते. रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीच्या सुपिकतेवर अनिष्ट परिणाम होतो. जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत जाते. दुसरीकडे महागडी व रासायनिक खते खरेदी करणे शेतकर्‍यांना कठीण झाले आहे. महागाईने शेतकर्‍यांचे कंबरडेच मोडल्याची वेळ आली आहे. आर्थिक ओढाताणीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. महागडी रासायनिक खते वापरणे परवडत नसल्याने अनेक शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळला आहे. मात्र, त्यासाठी शेणखत वापरणे गरजेचे आहे. सेंद्रिय शेतीमुळे चांगले पीक येत असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले. त्यामुळे शेतात शेळ्या-मेंढ्या बसविल्या जातात. यासाठी फिरतीवरील मेंढपाळांशी अगोदर संपर्कात रहावे लागते. शेतीची मशागत, पेरणी, कोळपणी हे योग्य वेळीच करावी लागते. आधुनिक यंत्राचा वापर करून का होईना पण शेती करणे अनेकांनी सोडले नाही.सध्या रहाटणी येथील तापकीरमळा परिसरात मेंढपाळांचे वाडे दाखल झाले आहेत. शेतात ठिकठिकाणी शेळ्या-मेंढ्या बसवले जात आहेत. एकीकडे शहराचे मोठ्या प्रमाणात शहरीकरण होत असताना दुसरीकडे शेतकरी जुन्या परंपरा सुरू ठेवत असल्याचे पाहून ग्रामीण भागात आल्याचा भास होतो. सिमेंटच्या जंगलात सुपीक शेती करण्याचे धाडस अनेक शेतकरी करीत आहेत. अगदी काही दिवसांवर मृगनक्षत्र येऊन ठेपला आहे. मोसमी पावसाला केव्हाही सुरुवात होऊ शकते. त्यामुळे शहरातीलही शेतकरी जमिनीच्या मशागतीसाठी कामात मग्न दिसून येत आहे. (वार्ताहर)