शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

पुणे मेट्रोच्या खोदकामात यंत्रांच्या वापरामुळे अन्य काहीच नाही; थेट मातीच हाती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 7:41 PM

शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण भुयारी आहे.

ठळक मुद्देहत्तीची हाडे डेक्कन महाविद्यालयात

पुणे: मंडईजवळ मेट्रोसाठी खोदकाम करताना हत्तीच्या हाडांचे अवशेष अवघ्या दहा फुटांवर सापडले, मात्र अन्य ठिकाणी जमिनीखाली २८ मीटर खोलीवर जाऊनही काहीच मिळाले नाही. याचे कारण ते खोदकाम यंत्राद्वारे झाल्यामुळे यंत्रातून थेट मातीच हाती येत होती. दरम्यान मंडईजवळ सापडलेले हत्तीचे अवशेष महामेट्रोच्या वतीने डेक्कन महाविद्यालयाच्या पुरात्तत्व विभागात जमा करण्यात आले आहेत.

शिवाजीनगर ते स्वारगेट हा ५ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण भुयारी आहे. जमिनीखालून तब्बल २८ ते ३० मीटर अंतरावरून तो आहे. त्याच ५ भुयारी स्थानकेही आहेत. हा बोगदा तयार करतानाही पुणे शहराचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता जमिनीत खोलवर काहीतरी सापडेल असा अनेकांचा अंदाज होता, मात्र तसे काहीही झालेले नाही. याचे कारण हे सगळे खोदकाम यंत्राद्वारे झाले असे सांगण्यात येत आहे. यंत्रातून खोदकाम करताना खोदलेल्या भागाची थेट मातीच किंवा अगदी लहान-लहान तुकडे यंत्रातच असणाऱ्या एका सरकत्या पट्टीवर जमा होतात व ते तसेच मागेमागे जात थेट मालमोटारीत जमा होतात. त्यामुळेच या खोदकामात कसलेच अवशेष मिळाले नाहीत, अन्यथा या भागातही नक्कीच काहीतरी मिळाले असते असे आता बोलले जात आहे.दरम्यान मंडईजवळ खोदकाम करताना सापडलेले हत्तीच्या हाडांचे अवशेष महामेट्रोने डेक्कन महाविद्यालयाला दिले. तेथील पुराजैव शास्त्रज्ञ डॉ. पंकज गोयल यांनी सांगितले की मेट्रोकडून नुकतेच हे अवशेष पाठवण्यात आले. त्यावर आता संशोधन केले जाईल. प्राथमिक अंदाज हे अवशेष १०० ते १५० वर्षांपुर्वीचे आहेत असाच आहे. त्यात काही फरक पडणार नाही, मात्र दुसरे अवशेष कोणत्या प्राण्याचे, त्यांना मरण कशामुळे आले याचा शोध लागेल. तसेच त्या परिसरात आणखी खोदकाम होणार आहे. संबधितांना ते काळजीपूर्वक करण्यात सांगण्यात आले आहे, तसेच आणखी काही सापडले तर त्याची तत्काळ कल्पना द्यावी अशाही सुचना देण्यात अले आहे असे डॉ. गोयल म्हणाले.

टीबीएममधील पडद्यावर पुढे काय आहे ते दिसतेशिवाजीनगर ते स्वारगेट दरम्यान मेट्रोच्या भुयारी मार्गाचे खोदकाम करताना कसलेही अवशेष वगैरे मिळाले नसल्याचे महामेट्रोच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. अडीच किलोमीटरचा हा भुयारी मार्ग आतील बाजूने सिमेंटचे अस्तर वगैरे करून पूर्ण तयार झाले आहे.मंडईजवळ खोदकाम करताना अवघ्या १० फूटांवर हत्तीच्या हाडांचे अवशेष सापडले. त्यामुळे आता शिवाजीनगर ते सिव्हिल कोर्ट दरम्यान पुर्ण झालेल्या अडीच किलोमीटर अंतराच्या भुयाराचे खोदकाम करताना काहीच कसे सापडले नाही अशी चर्चा होत आहे. त्याविषयी बोलताना मेट्रोच्या जनसंपर्क विभागाचे संचालक हेमंत सोनवणे म्हणाले, खोदकाम टनेल बोअरिंग मशिनद्वारे झालेले आहे, त्याच्या कटरने समोरच्या भागाची थेट मातीच होते हे खरे आहे, मात्र यंत्रामध्ये असणाऱ्या मॉनिटरच्या स्क्रिनवर कटरच्या समोर काय आहे ते स्पष्ट दिसते. त्यामुळे ते अडीच किलोमीटरचे खोदकाम करताना काहीच सापडले नाही ही वस्तुस्थिती आहे.

दरम्यान, मंडईजवळचे खोदकाम जेसीबी यंत्रांच्या साह्याने सुरू आहे. फक्त १० फूटांवर अवशेष सापडल्याने तसेच मंडई हा पुण्याचा सर्वाधिक जूना भाग असल्याने हे खोदकाम काळजीपूर्वक करावे अशा सुचना ठेकेदार कंपनीला देण्यात आल्या आहेत. सापडलेले सर्व अवशेष त्वरीत डेक्कन महाविद्यालयाकडे सुपूर्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो