मोरगाव परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:10 IST2021-03-21T04:10:09+5:302021-03-21T04:10:09+5:30

शनिवार (दि. २०) रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी मोरगाव, तरडोली, माळवाडी, ...

Untimely rain showers in Morgaon area | मोरगाव परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

मोरगाव परिसरात अवकाळी पावसाच्या सरी

शनिवार (दि. २०) रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी मोरगाव, तरडोली, माळवाडी, आंबेगाव बुद्रुक, देऊळगाव रसाळ या परिसरामध्ये पडल्या. पावसाबरोबरच सोसाट्याचा वारा, गारांचा तुरळक सडा पडला. आठवडाभरापासून या परिसरात ढगाळ वातावरणाने येथील ग्रामस्थ उकाड्याने त्रस्त होते. अचानक आलेल्या पावसात भिजून लहान मुले, तरुण आनंद घेत होते. पावसाबरोबरच तुरळक गारांचा वर्षाव दहा ते पंधरा मिनिटे झाला. पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी पंधरा ते वीस मिनिटे सुरु होत्या. गारा व पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे . उभ्या गव्हाच्या ओंब्या झडल्याने तसेच भिजलेल्या गव्हाचा पोत ढासाळत असून हरभऱ्याचेही नुकसान झाले असल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत आहे.

-------------------------

Web Title: Untimely rain showers in Morgaon area