शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील युवतीने साकारली शिवछत्रपतींची नयनरम्य रांगोळी; मोडी लिपीतून १ लाख वेळा ‘जाणता राजा’ लिहिलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:51 IST

मोडी लिपीतून १ लाख ११ हजार १११ वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी

पुणे : पुण्याच्या श्रुती गावडे यांनी मोडी लिपीतून १ लाख ११ हजार १११ वेळा ‘जाणता राजा’ लिहून छत्रपती शिवाजी महाराज यांची अश्वारूढ रांगोळी साकारली. या अनोख्या उपक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ रेकोर्ड’ मध्ये नोंद झालीये. मोडी लिपीच्या प्रसारासाठी मागील काही वर्षांपासून श्रुती काम करतेय. सलग २३ तास मेहनत घेत तब्बल बाराशे चौरस फुटाची ही रांगोळी साकारली आहे. 

श्रुती गावडे या मोडी लिपीच्या प्रसार आणि प्रचारासाठी अभिनव आणि कलात्मक उपक्रम राबवत आहेत. पुण्यात हेल्मेट सक्ती झाल्यानंतर त्यांनी स्वर, व्यंजन वापरून बनवलेले हेल्मेट खूपच गाजले. त्यानंतर त्यांनी दुचाकी देखील मोडी लिपीतून बनवली. मुलांना मोडी लिपीची गोडी लागावी, त्यांना ही लिपी समजावी यासाठी श्रुती यांनी मोडीतून अक्षर चकल्या बनवल्या. चहाचे कप, कॅलेंडर असे अनेक उपक्रम त्यांनी आजवर मोडीच्या प्रसारासाठी राबवले आहेत.  वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं 

श्रुति करत असलेल्या कामाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये व्हावी, असं तिच्या वडिलांचं स्वप्न होतं. शिवजयंतीनिमित्त राबवलेल्या उपक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकोर्डमध्ये झाल्यानं श्रुतिच्या वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय. गेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालंय. आपली भाषा कालपरत्वे अडगळीला पडते की काय असं वाटत असतानाच, श्रुती गावडे यांचा हा उपक्रम मोडी लिपीची साक्षरता दर्शवणारा आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSocialसामाजिकartकलाcultureसांस्कृतिकIndiaभारत