Pune - Solapur Highway वर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार तर एक गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 07:42 PM2021-09-27T19:42:25+5:302021-09-27T19:42:34+5:30

मृत्यू झालेल्यांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

unidentified vehicle hits two-wheeler on Pune-Solapur highway two killed and one seriously injured | Pune - Solapur Highway वर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार तर एक गंभीर जखमी

Pune - Solapur Highway वर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार तर एक गंभीर जखमी

Next
ठळक मुद्देगंभीर जखमी झालेल्यावर यवत मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू

यवत : यवत मध्ये पुणे सोलापूर महामार्गावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एक पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.

राधा बापू कर्हे (वय ३५ , ) व  नाना आप्पा कर्हे (वय ५२, दोघे रा.पळशी मोरगाव , ता.बारामती) यांचा अपघातात मृत्यू झाला असून दादा कर्हे हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार कर्हे कुटुंबीय त्यांच्या दुचाकी वरून यवत येथील त्यांच्या बहिणीकडे आले. बहिनीकडून परत जाताना पुणे सोलापूर महामार्गावर महती कंपनी समोर आल्यावर पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकी वरील दोघे महामार्गावर पडून गंभीर जखमी होत जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर यवत मधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.

Web Title: unidentified vehicle hits two-wheeler on Pune-Solapur highway two killed and one seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app