दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:57 PM2021-07-05T16:57:48+5:302021-07-05T16:58:10+5:30

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घटना, विहिरीत असलेल्या लोखंडी खांबाला त्यांचे डोके आपटून ते गंभीर जखमी होत पाण्यात पडले

Unfortunately! A farmer who went to start a power pump fell into a well and died | दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

दुर्दैवी! वीजपंप सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

Next
ठळक मुद्देतातडीने उपचारासाठी मंचर येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले

मंचर: वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथे रविवारी दुपारी घडली. हिरामण रामदास डोके (वय 45) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

वडगाव काशिंबेग येथील माळीमळा येथे शेतकरी हिरामण डोके कुटुंबीयांसह राहतात. वरपट्टी नावाच्या शेतात त्यांची विहीर आहे. रविवारी दुपारी पिकांना औषध फवारणी करण्यासाठी तसेच विहिरीवरील वीजपंप सुरू करण्यासाठी ते पत्नीसह गेले होते. दुर्दैवाने पाय घसरून डोके विहिरीत पडले. मोटार ठेवण्यासाठी विहिरीत असलेल्या लोखंडी खांबाला त्यांचे डोके आपटून ते गंभीर जखमी झाले. ते पाण्यात बुडत असताना पत्नीने मदतीसाठी आरडाओरडा केला.

परिसरात काम करत असलेले सुरेश तारू, बाळशिराम डोके, मारुती डोके, श्रीराम डोके हे मदतीसाठी धावले. सुरेश तारू यांनी पाण्यात उडी मारून तळातून हिरामण डोके यांना बाहेर काढले. त्यांना तातडीने उपचारासाठी मंचर येथील खाजगी दवाखान्यात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. घोडेगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करून हिरामण डोके यांच्यावर रात्री शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. हिरामण डोके यांचा शेती व वाहतूक व्यवसाय होता. त्यांच्या मागे आई-वडील,एक भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. 

Web Title: Unfortunately! A farmer who went to start a power pump fell into a well and died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.