शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
2
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
3
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
4
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
5
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
6
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
7
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
8
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
9
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
10
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
11
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
12
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
13
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
14
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
15
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
16
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
17
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
18
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
19
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
20
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोन संचालकांचे पद रद्द झाल्याने सहकारी संस्थांमध्ये अस्वस्थता

By admin | Updated: September 14, 2016 00:53 IST

माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधारी संचालक मंडळातील संचालकांनी बंड केले. सुरुवातीला तोडगा काढला.

बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखान्यातील सत्ताधारी संचालक मंडळातील संचालकांनी बंड केले. सुरुवातीला तोडगा काढला. पुन्हा बंडखोर संचालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. कारखान्याकडून घेतलेल्या उचलीची परतफेड केली नाही. त्यामुळे बंडखोरी केलेल्या दोन संचालकांचे पद रद्द झाले. याच वेळी अन्य संचालकांनीदेखील मागील वर्षी दिवाळी अ‍ॅडव्हान्सपोटी घेतलेली रक्कम परत केली नाही. त्यावरून प्रादेशिक साखर सहसंचालकाने नोटिसा बजावल्या आहेत. अ‍ॅडव्हान्सच्या रकमा वेळेत परत करण्याची मुदत असते. मात्र, सहकारात सर्व काही चालते, या आविर्भावात असलेल्यांना चांगलाच दणका बसला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलचा पराभव करून दीड वर्षापूर्वी ज्येष्ठ संचालक चंद्रराव तावरे, विद्यमान चेअरमन रंजन तावरे यांच्या नेतृत्वाखाली माळेगाव कारखान्यात सत्ता आली. वर्षपूर्ती होण्यापूर्वीच उपाध्यक्ष रामदास आटोळे यांच्यासह अन्य काही संचालकांनी कारखान्याच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप करून बंडाचा पवित्रा घेतला. सुरुवातीला त्यांची समजूत काढली गेली; परंतु सत्तासंघर्ष तीव्र झाला. त्यातच ‘अ‍ॅडव्हान्स’च्या संदर्भात तक्रार झाली. दोन संचालकांचे पद रद्द झाले. आता याच मुद्द्यावर पुन्हा अन्य १७ संचालकांना नोटिसा बाजावण्यात आल्या आहेत. तेव्हापासून सत्ताधारी संचालक मंडळाची धावपळ सुरू झाली आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यापर्यंत या तक्रारी गेल्या.ज्या संचालकांना नोटिसा बजावल्या आहेत, त्यांनी अ‍ॅडव्हान्सपोटी घेतलेली रक्कम कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावानुसार घेतली. कारखान्याचे सभासद म्हणून ही रक्कम घेतलेली आहे. सहकार कायद्यानुसार या अ‍ॅडव्हान्स रकमेचा विचार केल्यास सर्वच सहकारी संस्थांच्या मार्फत सभासदांना अ‍ॅडव्हान्स देण्यात येतो. तेदेखील अडचणीत येतील. ९७व्या घटनादुरुस्तीनुसार थकबाकीदार संचालकाला सहकारी संस्थांवर पदाधिकारी, संचालक म्हणून काम करता येत नाही. माळेगाव कारखान्याच्या निमित्ताने सहकार क्षेत्रातील वातावरण ढवळून निघले आहे. अध्यक्ष रंजन तावरे यांनी संचालक मंडळ कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास माळेगावमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात व्यक्त केला. सध्या मात्र, प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेल्या नोटिशीमुळे संचालक मंडळाची धावपळ वाढली आहे.