शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

विद्रूपीकरण करणारे अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग आठवडाभरात हटवणार; पुणे महापालिका व पोलिसांची संयुक्त कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:23 IST

शहरात कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे होर्डिंग, फ्लेक्स आणि पोस्टर उभारून शहराचे विद्रूपीकरण केले जात आहे

पुणे : शहरातील अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंगवर महापालिका आणि पोलिस प्रशासनाकडून संयुक्त कारवाई केली जाणार आहे. शहराचे विद्रूपीकरण करणारे सर्व अनधिकृत फ्लेक्स व होर्डिंग आठवडाभरात हटवले जाणार आहे. यासोबतच अनधिकृत फ्लेक्सची छपाई करणाऱ्यांसह अनधिकृत विक्रेते, पथारी व्यावसायिकांवर आणि बेवारस वाहनांवरही कारवाई केली जाणार असल्याचे महापालिका व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

शहरातील अनधिकृत फ्लेक्स, होर्डिंग्ज, अतिक्रमणे, बेवारस वाहने आदी समस्यांसंदर्भात बुधवारी पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषद घेतली. या वेळी पोलिस आणि महापालिकेचे तर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

शहरात कोणत्याही प्रकारची जाहिरात करण्यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाकडून सशुल्क परवानगी दिली जाते. मात्र, महापालिकेची परवानगी न घेता शहरात अनधिकृतपणे होर्डिंग, फ्लेक्स आणि पोस्टर उभारून शहराचे विद्रूपीकरण केले जाते. अशा अनधिकृत फ्लेक्स-होर्डिंगवर कारवाई केल्यानंतरही पुन्हा फ्लेक्स उभारले जातात. ही कारवाई परिणामकारक होण्यासाठी आणि शहराचे विद्रूपीकरण थांबवण्यासाठी आता पोलिस व महापालिका संयुक्तरीत्या कारवाई करणार आहे. फ्लेक्स लावणाऱ्यांसह अनधिकृत फ्लेक्स छापणाऱ्या आणि त्याचे सांगाडे तयार करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पहिल्या वेळी संबंधितांना समज दिली जाईल. त्यानंतर फ्लेक्स छपाईच्या मशीन जप्त केल्या जातील. नगरसेवक, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन ही कारवाई केली जाणार आहे. कारवाईला विरोध करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

तसेच शहरात अनेक ठिकाणी बेवारस वाहने पडून आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडण्याबरोबरच अन्य समस्याही निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर बेवारस वाहने उचलण्यासाठीही मोहीम संयुक्तपणे हाती घेण्यात येणार आहे. अशा बेवारस वाहनांचा शोध घेऊन त्यावर नोटीस चिटकवण्यात येईल. दिलेल्या मुदतीत मालकांनी वाहने न हटवल्यास ते उचलण्यात येईल. प्रत्येक प्रभागात २-३ ‘डंपिंग यार्ड’ केले जातील. त्यानंतर या वाहनांचा लिलाव केला जाईल. वाहन उचलण्याचा खर्च संबंधित वाहनमालकाकडून वसूल केला जाईल, असे पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्तांनी सांगितले.

पाणी साचण्याच्या ठिकाणी उपाययोजना

पावसाळ्यात मुख्य रस्ते व उपरस्त्यांवर पाणी साचणारी ४०० ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. येथे पाणी साचू नये, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच झाडांच्या फांद्या कोसळल्यानंतर करावयाची कार्यवाही, सांडपाणी व पावसाळी वाहिन्यांची सफाई व ड्रेनेजची झाकणे समपातळीत घेण्याविषयीही पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा करण्यात आली.

शहराच्या विकासालाही शिस्त असली पाहिजे. घनकचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने केले जात असले तरी शहराची सौंदर्यवृद्धीही गरजेची आहे. त्यादृष्टीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पोलिस व पालिका प्रशासन समन्वयाने काम करत असून गेल्या सहा महिन्यांत शहरात चांगले बदल घडताना दिसत आहेत. याच धर्तीवर आगामी काळातही विकासकामे केली जातील. - नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका.

या गोष्टींवरही होणार कारवाई

- शहरातील मैदाने, मोकळ्या जागांवर पुरेशी प्रकाशव्यवस्था करणार

- मैदाने, मोकळ्या जागांभोवती सीसीटीव्ही बसवणार.

- अशा ठिकाणी गैरकृत्य केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई.

- शाळांपासून १०० मीटरमध्ये प्रतिबंधित पदार्थ विक्री रोखणार

- कारवाईसंदर्भात पोलिस निरीक्षक आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका होणार

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Illegal Flex, Hoarding Removal Drive in a Week

Web Summary : Pune Municipal Corporation and police will jointly remove unauthorized flex boards and hoardings within a week. Action will also be taken against printers, vendors, and abandoned vehicles to prevent defacement of the city. Joint operations will address traffic congestion and ensure public safety, including measures to prevent waterlogging during monsoons.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPoliceपोलिसMONEYपैसाGovernmentसरकारSmart Cityस्मार्ट सिटीPoliticsराजकारण