शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 18:36 IST

चिंचवड येथील केएसबी चौकात हा अपघात झाला.अपघातानंतर ट्रकचालक न थांबता निघून गेला.

पुणे (पिंपरी) : वाहनाला ओव्हरटेक करणाऱ्या  ट्रकचा कट लागल्याने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. तसेच अडीच वर्षीय मुलगी व वडील यात जखमी झाले. चिंचवड येथील केएसबी चौकात मंगळवारी हा अपघात झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा राकेश पाटील (वय २६) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अडीच वर्षीय उन्नती पाटील व राकेश जगन्नाथ पाटील (वय ३६, रा. जाधववाडी, चिखली) असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी राकेश पाटील यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.फिर्यादी राकेश मंगळवारी पहाटे पावणे पाचच्या सुमारास त्यांची मुलगी उन्नती व पत्नी प्रतिभा यांच्यासह दुचाकीवरून कुदळवाडीकडून मोरवाडीकडे जात होते. दरम्यान केएसबी चौक येथे पुलावरील चढावरून डाव्या बाजूने फिर्यादी पाटील दुचाकी चालवित होते. त्यावेळी एका वाहनाला ओव्हरटेक करताना अज्ञात ट्रकचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून फिर्यादी पाटील यांच्या दुचाकीला कट मारला. त्यामुळे पाटील व त्यांची मुलगी तसेच पत्नी दुचाकीवरून पडले. यात प्रतिभा यांच्या डोक्याला व हनुवटीला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर मुलगी उन्नती व राकेश पाटील जखमी झाले. अपघातानंतर ट्रकचालक न थांबता निघून गेला. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र गिरणार तपास करीत आहेत. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूtwo wheelerटू व्हीलरpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड