पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 19:18 IST2021-07-06T19:14:38+5:302021-07-06T19:18:29+5:30

पिंपरी चिंचवड, चिखली, वाकड, भिगवण, खेड, लोणी काळभोर परिसरातुन दुुचाकी चोरल्याचे सांगितले.

Two-wheeler thieves arrested in Pune district; 7 bikes seized | पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त 

पुणे जिल्ह्यात दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक; ७ दुचाकी जप्त 

लोणी काळभोर : लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाने पिंपरी चिंचवड, चिखली, वाकड, भिगवण, खेड, लोणी काळभोर परिसरात दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांंना अटक केली. त्यांच्याकडून २ लाख २० हजार रूपये किंमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात यश मिळवले आहे. 

याप्रकरणी महादेव पोपट पांगारकर ( वय २६, रा. पांगारकर वस्ती, सहजपुर, ता. दौंड ) व त्याचा मित्र राहुल सुरेश भिलारे ( रा. जावजीबुवाची वाडी ता.दौंड ) यांना अटक करण्यात आली आहे. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३ ) रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या तपास पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार शैलेश कुदळे व बाजीराव विर यांना महादेव पांगारकर हा चोरीची ऍक्टिव्हा मोटार सायकल घेवुन लोणी काळभोर गाव परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर पांगारकर यांना शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले.त्याच्याकडील मोटार सायकल ही उरूळी देवाची ( ता हवेली ) येथुन चोरी केल्याचे सांगितले. पांगारकर याने त्याचा मित्र राहुल भिलारेच्या मदतीने पिंपरी चिंचवड, चिखली, वाकड, भिगवण, खेड, लोणी काळभोर परिसरातुन दुुचाकी चोरल्याचे सांगितले. भिलारे यालाही सापळा रचुन अटक करण्यात आली.त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

पुणे शहर, पिंपरी - चिंचवड तसेच पुणे ग्रामीण जिल्हयातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील २ तर खेड, भिगवण, चंदननगर, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच महादेव पांगारकर व राहुल भिलारे हे सध्या यवत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात हवे असलेले आरोपी आहेत. 

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ च्या नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, अक्षय कटके, प्रशांत सुतार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, निखील पवार, दिगंबर सालुंके यांनी केली आहे. 

Web Title: Two-wheeler thieves arrested in Pune district; 7 bikes seized