Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 12:08 PM2023-08-08T12:08:32+5:302023-08-08T12:09:27+5:30

दोघे शहरात दहशत निर्माण करण्यासाठी हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत होते

Two people who created terror on the streets of Daund city were shackled | Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

Video: दौंड शहरातील रस्त्यावर कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

googlenewsNext

पुणे : पुण्यात मध्यंतरी कोयता गॅंगने धुमाकूळ घातला होता. वाहने, दुकानांची तोडफोड, भरचौकात दहशत यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सदाशिव पेठेतील तरुणीवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याने तर सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर पोलिसांनी कारवाईला जोरदार सुरुवातही केली होती. पण आता पुन्हा कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

शहरासहित ग्रामीण भागातही कोयता घेऊन समाजात भीती निर्मण करण्याचे धाडस काही जण करू लागले आहेत. अशातच दौंड शहरात हातात धारदार कोयता घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांना पोलिसांनीअटक केली आहे. राकेश जगताप आणि सचिन नलावडे अशी त्यांची नावे आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार,  दौंड शहरामध्ये हातात धारदार कोयता घेऊन शहरातील रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या दोघांविरोधात दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी राकेश जगताप आणि सचिन नलावडे हे दोघे शहरातील रस्त्यावर हातात कोयता घेऊन मोटरसायकलवर फिरत असताना पोलिसांना माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: Two people who created terror on the streets of Daund city were shackled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.