शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

जगताप मळ्यात दोन गटांत हाणामारी

By admin | Updated: August 9, 2015 03:32 IST

ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचे पडसाद हवेली तालुक्यातही उमटू लागले आहे. तरडे येथील जगताप मळ्यात एकाच भावकीतील पराभूत व विजयी उमेदवारांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे

लोणी काळभोर : ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतरचे पडसाद हवेली तालुक्यातही उमटू लागले आहे. तरडे येथील जगताप मळ्यात एकाच भावकीतील पराभूत व विजयी उमेदवारांच्या दोन गटांत झालेल्या वादाचे पर्यवसान भांडणात झाले असून, दोन्ही बाजूने लोखंडी पाईप, सळ्या, काठ्या, दगड यांचा वापर करण्यात आल्याने दोन्ही गटांचे तीन महिलांसह एकूण आठ जण जखमी झाले आहेत. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडूभैरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार शुक्रवारी (दि. ७) दुपारी ३.३० ते ४ च्या सुमारास तरडे येथील जगताप मळा येथे घडला. या प्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या असून, २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील शरद शिवाजी जगताप, (वय ३५), विलास नामदेव जगताप ( ४८), पंकज अशोक जगताप (३१), सोनबा शिवाजी जगताप (३८), वैभव विलास जगताप (२०), अशोक नामदेव जगताप (४६), स्वप्नील अशोक जगताप (१९) व नवनाथ बाळासाहेब जगताप (३४, सर्व रा. जगताप मळा, तरडे, ता. हवेली) या आठ जणांना अटक करण्यात आली आहे. नवनाथ बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ६ आॅगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास त्यांचा भाऊ प्रेमदास यांस शिवाजी जगताप याने फोन करून, तुम्ही मतदान न केल्याने मी पराभूत झालो, असे म्हणून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर ७ आॅगस्ट रोजी दुपारी ४च्या सुमारास त्यांच्या भावकीतील नितीन शिवाजी जगताप, शरद शिवाजी जगताप, विलास नामदेव जगताप हे गज घेऊन, अशोक नामदेव जगताप, पंकज अशोक जगताप, शिवाजी नामदेव जगताप यांनी काठी, सोनबा शिवाजी जगताप व स्वप्निल अशोक जगताप हे दगड घेऊन इतर सहा जणांना घेऊन आले व त्यांनी बाळासाहेब बाबूराव जगताप, प्रेमनाथ व नवनाथ यांच्यासमवेत नवनाथ यांच्या पत्नी मनीषा, वहिनी स्वाती यांना मारहाण केली. हे सर्व जण ससूण रुग्णालय पुणे येथे उपचार घेत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ करत आहेत.(वार्ताहर)