सेवानिवृत्त शिक्षकाचे अडीच लाख चोरट्यांनी केले लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:11 IST2021-09-25T04:11:14+5:302021-09-25T04:11:14+5:30

दिलीप मारुती गोरडे (वय ६६, रा. शिंगवे पारगाव ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ...

Two and a half lakh thieves robbed a retired teacher | सेवानिवृत्त शिक्षकाचे अडीच लाख चोरट्यांनी केले लंपास

सेवानिवृत्त शिक्षकाचे अडीच लाख चोरट्यांनी केले लंपास

दिलीप मारुती गोरडे (वय ६६, रा. शिंगवे पारगाव ता. आंबेगाव जि. पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. दिलीप मारूती गोरडे हे त्यांचा मित्र भानुदास बबन येंधे यांच्यासमवेत गुरुवारी बँक आँफ इंडियामध्ये जाऊन तेथून २ लाख ४० हजार रुपये काढले होते. काढलेली रक्कम व दोन पासबुक आणि मुक्तबाई पतसंस्थाचे पासबुक पिशवीमध्ये घालून ती पिशवी डिकीमध्ये ठेवली होती. गोरडे आणि त्यांचा मित्र मेडिकलमध्ये गोळ्या घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर जगदंबा पतसंस्था आनंदवाडी येथे गेले. त्यावेळी गोरडे यांचा मित्र भानुदास म्हणाला की, पैशांची पिशवी हातात घेऊन चल. गोरडे यांनी पिशवी काढणेकरीता डिक्की पाहीली असता डिक्कीमध्ये ठेवलेली पैशांची पिशवी त्यांना दिसली नाही. पैसे चोरीला गेल्याने गोरडे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: Two and a half lakh thieves robbed a retired teacher