शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

त्रिपुरारी पौर्णिमेसाठी सजले अडीचशे वर्ष जुने 'कामेश्वर मंदिर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 18:22 IST

. शिव-पार्वती विवाहानंतर निघालेली वरात दर्शविणारी ही मुर्ती आहे.

ठळक मुद्देहेमाडपंती  बांधकाम : उजव्या सोंडेच्या सिध्दी विनायकाची देखणी मूर्ती कामेश्वर मंदिरासोबतच नेणे घाटावर आणखीही पेशवेकालीन मंदिरे

पुणे : पुण्यातील पेठांचे आणि पेशवेकालीन इतिहासाचे अतुट नाते आहे. पेशवेकाळाशी असेच नाते सांगणारा नेणे घाट आजही शनिवार पेठेमध्ये अस्तित्वात आहे. या घाटावर वसलेल्या मंदिरांपैकी तब्बल २५२ वर्षे जुने ' कामेश्वर मंदिर'  त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सजले आहे. गाभाऱ्यामध्ये सुंदरशी फुलांची आरास आणि मंदिराभोवती काढण्यात आलेल्या रांगोळीने मंदिराच्या सौंदर्यात भर घातली. हे मंदिर पेशवेकालीन असून हेमाडपंती शैलीचे पूर्ण दगडी बांधकाम आहे. पेशव्यांचे सरदार लेले यांनी याभागात घाट बांधला तसेच हे मंदिर बांधले. मंदिराचे दगडी प्रवेशद्वार आकर्षक असून महिरपी धाटणीचा नगारखाना विशेष आकर्षण ठरतो. मंदिराच्या आतमध्ये गोल आकाराचा मंडप असून गाभाऱ्याच्या मुखाशी सुर्यदेव आणि श्री विष्णूच्या देखण्या मुर्त्या आहेत. गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून आकाराने मध्यम परंतू तेवढेच देखणे आहे. या शिवलिंगावर चांदीचा मुखवटा चढविण्यात आला होता. यासोबतच गाभाºयात आणखी तीन देखण्या मुर्त्या आहेत. मधोमध नंदीवर आरुढ झालेले शंकर असून शंकराने पार्वतीला मांडीवर घेतलेले आहे. शिव-पार्वती विवाहानंतर निघालेली वरात दर्शविणारी ही मूर्ती आहे. तर उजव्या बाजूला कामेश्वरी देवीची मूर्ती आणि डाव्या बाजूला उजव्या सोंडेचा सिध्दीविनायक आहे. 

पानशेत धरण 1961 साली फुटल्यानंतर पुण्यात पूर आला होता. या पुराचे पाणी मंदिराच्या कळसाच्या वर चढले होते. नदीपात्राला अगदी लागून असलेले हे मंदिर त्यावेळी पूर्णपणे पाण्यात गेलेले होते. सरदार लेले यांनी मुठा नदीवर घाट बांधला होता. भाविक या घाटावर अंघोळ करुन ओल्यानेच मंदिरात येऊन दर्शन घेत असत असे मंदिराचे व्यवस्थापक प्रकाश आठवले यांनी सांगितले. या मंदिराचा मूळ पुरुष असून तो एका नागाच्या रुपात वास्तव्य करुन असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते. मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नंदी व मंदिरातील देवांच्या मूर्त्या धुतल्यानंतर त्याचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली कुपनलिकेची व्यवस्था. मुर्तीच्या भोवतीने पाणी एका नलिकेमधून जमिनीखाली जाते. जमिनीखालून असलेल्या गुप्त नलिकेद्वारे हे पाणी नदीपात्राकडे वाहून जाण्याची व्यवस्था आहे. कामेश्वर मंदिरासोबतच नेणे घाटावर आणखीही पेशवेकालीन मंदिरे आहेत. कामेश्वराच्या शेजारी बाणेश्वराचे मंदिर असून पूर्वेच्या दिशेला अमृतेश्वर पश्चिमेला ओंकारेश्वर देवस्थान आहे. यासोबतच गुपचूप यांचे वरद विनायक मंदिर, वीर मारुती, विष्णू मंदिरही आहे.

टॅग्स :PuneपुणेTempleमंदिर