शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

पुण्यातील सव्वादोनशे जुने वाडे-इमारती धोकादायक; महापालिकेकडून सर्वेक्षण   

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 7:53 PM

शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती तसेच वाडे कोसळण्याच्या घटना घडतात.

ठळक मुद्दे७५ इमारतींमधील धोकादायक भाग हटविला

पुणे : महापालिकेच्यावतीने दरवर्षी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करुन धोकादायक इमारतींना नोटीसा बजावण्या सोबतच धोकादायक भाग उतरविण्याची कारवाई केली जाते. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात 225 इमारती-वाडे धोकादायक असल्याचे समोर आले आहे. यातील ७५ इमारतींमधील धोकादायक भाग हटविण्यात आला असून कोसळण्याच्या स्थितीत असलेले दहा वाडे उतरविण्यात आले आहेत.      शहरात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती तसेच वाडे कोसळण्याच्या घटना घडतात. पालिका प्रशासनाने २००८ पासून शहरातील जुने वाडे तसेच धोकादायक इमारतींची पावसाळ्यापूर्वी पाहणी करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने पाहणी केलेल्या ८०० वास्तूंमधून २२५ इमारती/वाडे धोकादायक असल्याचे निदर्शनास आले. पालिकेच्या बांधकाम विभागाने या इमारतींमधील रहिवासी व भाडेकरुंना इमारती रिकाम्या करण्याबाबत नोटीसा बजावल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मध्यवस्तीतील वाड्यांचा समावेश आहे. पावसाळा सुरु होण्यापुर्वी पालिकेने दोन वेळा याबाबतचे प्रकटन प्रसिद्ध केले आहे.       अत्यंत धोकादायक असलेल्या दहा वाड्यांचे पूर्ण बांधकाम न्यायालयाच्या परवानगी उतरविण्यात आले आहे. तर, ७५ इमारतींमधील धोकादायक भाग हटविण्यात आला आहे. तर, १५० इमारतींमधील भाडेकरुंनाही नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार पोलिसांची मदत घेतली जात आहे.=== अनेक रहिवासी इमारत धोकादायक असल्याचे माहिती असूनही घर सोडण्यास तयार होत नाहीत. यामध्ये विषेशत: जुन्या वाड्यांमधील रहिवाशांची संख्या अधिक आहे. अनेक वास्तूंमध्ये भाडेकरु आणि मालकांमध्ये मालकी हक्काचा वाद असल्याने यामधून तोडगा निघत नाही.===पालिकेने शहरातील ८०० पेक्षा अधिक इमारतींचे सर्वेक्षण करुन यातील २२५ धोकादायक इमारतींना नोटीसा बजावल्या आहेत. यातील १५० इमारतींमधील भाडेकरुंचाही समावेश आहे. ७५ धोकादायक इमारतींचा भाग हटविण्यात आला असून दहा वाडे न्यायालयाच्या परवानगी उतरविण्यात आले आहेत.- राजेंद्र राऊत, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग, पुणे महापालिका

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाRainपाऊसBuilding Collapseइमारत दुर्घटना