शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जागेचे हस्तांतर रखडले

By admin | Updated: March 14, 2017 07:59 IST

शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना

पुणे : शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी पिंपरी-सांडस येथील वनविभागाकडून महापालिकेला मिळणार असलेल्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूरची जागा देण्याचा प्रस्ताव शासनदरबारी अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून होत असलेल्या या विलंबामुळे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची समस्या जैसे थे आहे. शहरामध्ये दररोज १४०० टन इतका कचरा तयार होतो, त्यापैकी ६०० टन इतका कचरा उरुळी देवाची व फुरसुंगी येथील डेपोमध्ये उघड्यावर टाकला जात आहे. केंद्र शासनाच्या सप्टेंबर २००० मधील निर्देशानुसार शहरातील कचरा कुठेही उघडयावर टाकला जाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याला १७ वर्षे उलटली तरी अद्याप या निर्देशांचे पालन पालिकेला करता आलेले नाही. याविरोधात पालिकेविरुद्ध हरित न्यायाधिकरणामध्ये उरुळी-देवाची कचरा डेपो संघर्ष समितीच्या वतीने खटला दाखल करण्यात आलेला आहे. उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचा कचरा टाकला जाणार नाही, असे आश्वासन पुणे महापालिकेकडून वेळोवेळी देऊनही त्याचे पालन करण्यात आलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कचरा प्रश्नाबाबत बैठक घेऊन हा प्रश्न तातडीने निकाली काढण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र आता राज्य शासनाकडूनच यावर कार्यवाही होण्यास विलंब होत आहे.पिंपरी-सांडस येथील वनविभागाची जागा ताब्यात घेऊन तिथे कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प पालिकेकडून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जागा ताब्यात घेण्याकरिता २ वर्षांपासून प्रक्रिया सुरू आहे. वन विभागाकडून पालिकेला देण्यात येणाऱ्या जागेच्या बदल्यात त्यांना तुळापूर येथील जागा देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी केंद्रीय पातळीवरून मान्यतेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जागा हस्तांतराचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे ४ महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला आहे. मात्र शासनाकडून अद्याप त्याला मंजुरी देण्यात आलेली नाही. कचरा प्रश्नावर आंदोलन पेटल्यानंतर प्रशासनाला तेवढ्यापुरती जाग येते, त्यानंतर कचरा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पुरेसे प्रयत्न प्रशासनाकडून होताना दिसत नाहीत. (प्रतिनिधी)