पुणे-बंगलोर महामार्गावील वाहतूक थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:09 IST2021-07-24T04:09:10+5:302021-07-24T04:09:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क खेड शिवापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. पुराचे पाणी पुणे-बंगलोर महामार्गावर आल्याने ...

Traffic on Pune-Bangalore highway stopped | पुणे-बंगलोर महामार्गावील वाहतूक थांबवली

पुणे-बंगलोर महामार्गावील वाहतूक थांबवली

लोकमत न्यूज नेटवर्क

खेड शिवापूर : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे. पुराचे पाणी पुणे-बंगलोर महामार्गावर आल्याने गोवा कर्नाटकात तसेच कोल्हापूर सांगलीकडे जाणारी वाहतूक सुरक्षेच्या कारणास्तव थांबविण्यात आली आहे. प्रवाशांची तसेच चालकांची अडचण होऊ नये म्हणून खेड शिवापूर टोलनाक्यावर वाहतूक पोलिसांनी कोल्हापूर सांगली तसेच कर्नाटककडे जाणाऱ्या वाहनांना थांबविले आहे. या मध्ये मालवाहतूक करणारी वाहने रस्त्याच्या बाजूला लावण्यात आली. तर प्रवासी गाड्या वळवून माघारी पाठवण्यात आल्या. सद्य स्थितीत सातारापर्यंत जाणाऱ्या वाहनांना पुढे सोडण्यात आले आहे. वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलीस निरीक्षक रणदिवे म्हणाले, कोल्हापूर परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. तसेच महामार्गावर पुराचे पाणी आल्यामुळे रस्ता बंद आहे. त्यामुळे पुढील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Traffic on Pune-Bangalore highway stopped