शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रायरेश्वर, रोहिडेश्वर किल्ल्यांवर पर्यटनाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST

मागील आठवड्यात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्ल्यांवर बंदी घातली होती. ...

मागील आठवड्यात वेल्हे तालुक्यातील तोरणा किल्ल्यावर काही पर्यटकांनी उपद्रव केल्याने वेल्हे प्रशासनाने राजगड व तोरणा किल्ल्यांवर बंदी घातली होती. तर वाई आणि भोर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या केंजळगडावर फिरायला गेलेला दहा वर्षांचा मुलगा दाट धुक्यामुळे अंदाज न आल्याने पाय घसरून पडल्याने जखमी झाला होता. अशा घटना वारंवार घडतात. या घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने दुर्गभ्रंमतीवर बंदी घातली आहे. वेल्हे तालुक्यातील किल्ल्यांवरील पर्यटनाला बंदी घातल्याने अनेक पर्यटक भोर तालुक्यातील रायरेश्वर व रोहिडेश्वर किल्ल्यावर एकच गर्दी करू लागले होते. त्यामुळे सोमवारपासून भोर तालुक्यातीला किल्ल्यांवर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.

भोर तालुक्यात दरवर्षी पावसाळ्यात धबधब्यांवर भिजण्यासाठी आणि पर्यटनास वरंध घाट, आंबाडखिंड घाट, भाटघर आणि निरादेवघर धरणांवरही पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. सेल्फी काढतात. अशा वेळी होणाऱ्या धावपळीत पाय घसरून पडणे, दरडी डोक्यात पडणे, पाण्यात बुडणे अशा घटना घडू शकतात. मात्र, याकडे पर्यटक दुर्लक्ष करीत असतात. यामुळे या गोष्टींचा विचार करून भोर तालुका प्रशासनाने तालुक्यात किल्ल्यांवर आणि पर्यटनस्थळांवर पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे.

चौकट

वरंध घाट व आंबाडखिड घाट परिसरात पडतात दरडी

भोर तालुक्यात पावसाळ्यात हिरवेगार डोंगर, वृक्षवेली, फेसाळणारे धबधबे हे मनमोहक दृष्य पाहण्यासाठी तालुक्यातील व बाहेरील पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र, डोंगरी भाग असल्याने पावसाळ्यात भोर-महाड रस्त्यावरील वरंध घाट व भोर-मांढरदेवी रस्त्यावरील आंबाडखिड घाटात मोठ्या प्रमाणात दरडी पडतात. यामुळे अनेकदा रस्ता बंद होतो. तर धबधब्यात दगडी पडतात यातून अपघात घडू शकतात. त्यामुळे सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

रायरेश्वर किल्ला फोटो