कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 17:29 IST2025-08-23T17:27:55+5:302025-08-23T17:29:05+5:30

ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत

Toll waiver for vehicles going to Konkan, passes will be available on specific roads till September 8 | कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास

कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी, ८ सप्टेंबरपर्यंत विशिष्ट रस्त्यांवर मिळणार पास

पुणे : गणेशोत्सवासाठीकोकणात जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरील टोलनाक्यांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

या निर्णयानुसार, २३ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील रस्त्यांवरून कोकणात जाणाऱ्या भाविकांना तसेच एसटी बसला टोलमाफीची सवलत मिळणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव सचिन चिवटे यांनी याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. ग्रामीण व शहर पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत दिल्या जाणाऱ्या पासची एकत्रित माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या ठिकाणी पास मिळणार

गणेशोत्सव २०२५ कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे टोलमाफी पासवर गाडी क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर नमूद असेल. परिवहन विभाग, वाहतूक विभाग, पोलिस ठाणे, आरटीओ यांनी समन्वय साधून पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस चौकी आणि आरटीओ कार्यालयात पास उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: Toll waiver for vehicles going to Konkan, passes will be available on specific roads till September 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.