शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यावरील रांगांचा चालकांना त्रास

By admin | Updated: May 26, 2014 05:24 IST

मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वेळेचा व पैशाचा अपव्यय

किवळे : मुंबई-पुणे महामार्गावरील सोमाटणे फाटा येथील टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने वेळेचा व पैशाचा अपव्यय होत असून, स्थानिकांसह वाहनचालक व प्रवासी त्रस्त आहेत. काही वाहनचालकांकडून अनेकदा लेनची शिस्तही पाळली जात नसून, ठेकेदाराकडून नाक्यावरील दोन्ही बाजूंची एक-एक लेन बंद ठेवली जात असल्याने गैरसोईत आणखी भर पडत आहे. त्यामुळे स्थानिकांना वेगळ्या लेनसह इतर लेनची व टोलवसुली खिडक्यांची संख्या वाढवून गैरसोय दूर करावी, अशी मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरील सोमाटणे फाटा येथे या रस्त्याची देखभाल व दुरुस्ती करणार्‍या म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत सप्टेंबर २००६ मध्ये नाका उभारून टोल वसुली सुरू आहे . आठ वर्षांत या महामार्गावरून ये -जा करणार्‍या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे . मात्र लेनच्या संख्येत वाढ झालेली नाही . उलट नाक्यावरील दोन्ही बाजूकडील एक-एक लेन अनेकदा बंद ठेवली जात आहे. शनिवारी व रविवारी सर्वाधिक वर्दळ असते. त्या वेळी वाहनचालकांकडून लेनची शिस्त पाळली जात नाही. (वार्ताहर)