पुणे : महापालिकेच्या चार सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या शुक्रवारी जाहीर केलेल्या आराखड्यावर सोमवारपासून (दि. १०) हरकती नोंदविता येणार आहे. येत्या २५ आॅक्टोबरपर्यंत या हरकती नोंदविता येणार आहे. महापालिकेच्या मुख्य भवनातील स्वागत कक्ष, सावरकर भवनमधील निवडणूक विभाग व सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये लेखी स्वरूपात हरकती नोंदविता येणार आहेत. त्याचबरोबर ई-मेलवरही हरकती पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १० ते २५ आॅक्टोबरदरम्यान हरकती नोंदविण्यात येणार आहेत. या हरकतींवर ४ नोव्हेंबर रोजी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून २५ नोव्हेंबरपर्यंत प्रभागरचनेला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}