२४ तासांत सव्वा टीएमसी पाणीसाठा

By Admin | Updated: June 26, 2015 04:16 IST2015-06-26T04:16:54+5:302015-06-26T04:16:54+5:30

पावसाला सुरुवात झाल्यापासून खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये पाण्याची ३.८६ अब्ज घनफूट (टी.एम.सी.) वाढ झाली आहे.

The TMC water storage in 24 hours | २४ तासांत सव्वा टीएमसी पाणीसाठा

२४ तासांत सव्वा टीएमसी पाणीसाठा

पुणे : पावसाला सुरुवात झाल्यापासून खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये पाण्याची ३.८६ अब्ज घनफूट (टी.एम.सी.) वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी आठपर्यंत चोवीस तासांत १.२७ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. महिनाभर पुरेल
एवढे पाणी एकाच दिवसांत जमा झाले आहे.
एकूण ६.२२ टीएमसी पाणीसाठा या धरणसाखळीत झाला आहे. त्यामुळे आगामी पाच महिन्यांसाठी पाण्याची तरतूद झाली आहे. टेमघरमध्ये असलेला शून्य टक्के साठा वाढून आता ९.४७ टक्के पाणी जमा झाले आहे. वरसगावमध्ये १२.५६, पानशेत धरणात ३२.६८ तर खडकवासला धरणात ४४. ५० टक्के पाणीसाठा आहे. सर्व धरणांत एकूण २१. ६८ टक्के पाणीसाठा आहे.

Web Title: The TMC water storage in 24 hours