प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 15:35 IST2023-01-24T15:33:37+5:302023-01-24T15:35:56+5:30

रेडिओलॉजीच्या विद्यार्थीनीची गळफास घेऊन आत्महत्या

Tired of her husband troubles after love marriage the student took the extreme step | प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल

प्रेमविवाहानंतर पतीच्या त्रासाला कंटाळून तिने उचलले टोकाचे पाऊल

धनकवडी : प्रेम विवाहानंतर काही दिवसांतच त्रास देणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून रेडिओलॉजी च्या विद्यार्थीनीने टोकाचे पाऊल उचलले. तिनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज येथे घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पती विरुध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अविनाश कुरेवार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर समिक्षा राहुल माने (वय २३ वर्षे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. 

समिक्षा मुळची यवतमाळची. तिने बीएससीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यात रेडिओलॉजीचे शिक्षण घेत होती. दरम्यानच्या काळात ती यवतमाळ येथे एका रुग्णालयात जॉब करत असताना तेथे तीची आरोपी अविनाश कुरेवार सोबत मैत्री झाली होती. 

मैत्री नंतर दोघांनी विवाहचा निर्णय घेतला होता. मात्र त्याला समिक्षाच्या आई- वडिलांनी दोघेही स्वत:च्या पायावर उभे रहा आणि नंतर विवाह करा असे समजावून सांगितले होते. या मुळे समिक्षा पुढील शिक्षणासाठी पुण्यात आली होती. मात्र पुण्यात आल्यानंतर त्यांनी आई-वडिलांना न सांगता विवाह केला.

दरम्यान ती पुण्यात आल्यानंतर अविनाश नेहमी तीच्या आई-वडिलांना फोन करुन तुमची मुलगी दुसऱ्या मुलाबरोबर बोलते, तीला समजावून सांगा, मला तीच्याशी विवाह करायचे आहे' असे म्हणत दमदाटी करत तसेच समिक्षाला मारहाण करत होता. या नंतर तो समिक्षा ला हळूहळू टाळू लागला होता. तीचा फोनही घेत नव्हता. दरम्यान अविनाशने समिक्षाच्या लहान बहिणाला ८ जानेवारीला फोन करुन एक नंबर पाठवून त्यावर कॉल करायला सांगितले. तीच्या बहिणीने कॉल केल्यावर समोरच्या व्यक्तीने समिक्षाने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले. तीच्या वडिलांनी ससूनला येऊन समिक्षाचा मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर अविनाश विरुध्द तक्रार दाखल केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव तपास करत आहेत.

Web Title: Tired of her husband troubles after love marriage the student took the extreme step