शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 21, 2015 00:44 IST

देशाच्या लौकिकात भर घालणाऱ्या फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआय) दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांवर निवृत्तीवेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे.

पुणे : देशाच्या लौकिकात भर घालणाऱ्या फिल्म अ‍ॅँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआय) दोनशेहून अधिक कर्मचाऱ्यांवर निवृत्तीवेतनाअभावी उपासमारीची वेळ आली आहे. ३०-४० वर्षांपासून अनेक कर्मचारी पेन्शन मिळावे म्हणून खेटा घालत आहेत. १९७३ ते १९८३ या कालावधीत एफटीआयआयमध्ये रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा पेन्शन सुविधा सुरू न झालेल्यांमध्ये समावेश आहे. प्रथम श्रेणी अधिकाऱ्यांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. एफटीआयमधील या कर्मचाऱ्यांना जीपीएफ (गव्हर्नमेंट प्रॉव्हिडंड फंड) ही योजना लागू आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांना सीपीएफमध्ये (कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन योजना) वर्ग करण्यात आले. त्याबाबत त्यांना काही माहितीही देण्यात आली नाही. मुळात हे वर्गीकरणच कर्मचाऱ्यांना मान्य नाही. गेल्या ३०-४० वर्षांपासून कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत नसल्याने या कर्मचाऱ्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. आरोग्याच्या सुविधांसाठी पैसे नाहीत. निवृत्तीनंतर मिळालेली लाख-सव्वालाख रुपयांची ग्रॅज्युएटीची रक्कम कधीच संपली. महागाईच्या दिवसांत उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न प्रत्येकासमोर आहे. ३०-३५ वर्षे इनामेइतबारे सेवा करूनही अखेरीस होत असलेली ससेहोलपट कधी संपेल, असा प्रश्न या निवृत्त कर्मचाऱ्यांना पडला आहे.(प्रतिनिधी)याविषयी ‘लोकमत’कडे कैफियत मांडताना एम. के. वीर म्हणाले, ‘‘पेन्शन योजना रद्द करण्यात आली आहे, असा कुठलाही अध्यादेश नाही. याविषयी विचारणा केली असता कुणीही ठोस माहिती देत नाही. धर्मदाय आयुक्तांनीही, या कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅच्युइटी द्या, असे आदेश दिले आहेत. माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव १९८७ मध्ये येथे आले असता त्यांच्यासमोर पेन्शनचा प्रश्न उपस्थित केला. पण एफटीआयआयने पेन्शनसंदर्भातील कागदपत्रे मंत्रालयाकडे पाठविली नसल्याचे त्यांनी सांगितले. पेन्शनसंदर्भातील पत्र का पाठविण्यात आले नाही, याची माहिती मिळालेली नाही.’’ पेन्शनसंदर्भात ७ मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्याची माहिती वारंवार मागण्यात आली. अधिकाऱ्यांपासून राष्ट्रपतींपर्यंत सर्वांना पत्र, निवेदन दिले; पण त्याचा काही उपयोग झाला नसल्याची व्यथा वीर यांनी मांडली. याबाबत दखल घेऊन पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी २४ फेब्रुवारी रोजी उपोषण करणार असल्याचे वीर यांनी सांगितले. या प्रश्नासंदर्भात एफटीआयआयचे संचालक डी. जे. नारायण यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की कर्मचाऱ्यांना सीपीएफ योजना लागू आहे. हा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. कर्मचाऱ्यांना पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून केंद्रस्तरावर पाठपुरावा करण्यात आला. पेन्शनसंदर्भात या कर्मचाऱ्यांना कुणीतरी चुकीची माहिती देत आहे.