शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

...त्या त्या वेळी मला इतिहासाचा नव्याने साक्षात्कार होतो; राज ठाकरेंचे बाबासाहेब पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 4:03 PM

बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही.

पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आज १०० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. या निमित्ताने राज्यभरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बाबासाहेबांची भेट घेत त्यांना भगवी शाल, पगडी आणि गुलाबांच्या फुलांचा पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. याचवेळी ठाकरे यांनी पुरंदरेंबद्दल गौरवोद्गार देखील काढले. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेपुणे दौऱ्यावर असून याच दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वाढदिवस आल्याने 'दुग्धशर्करा योग' जुळून आला. या निमित्ताने पुण्यात राज ठाकरे यांनी बाबासाहेब यांच्या घरी जाऊन त्यांना १०० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना बाबासाहेबांबद्दल गौरवोद्गार काढले. 

ठाकरे म्हणाले, बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनातून इतिहासाला धक्का लावला नाही आणि दंतकथांना शिरकाव करू दिला नाही. इतिहासाच्या पानात जे सापडलं आणि जे खरं आहे तेच लोकांसमोर मांडलं. एखादी दंतकथा असेल तर ते तसं सांगतात.या कथेला आधार नाही असाही आवर्जून उल्लेख ते करतात. सांगणं हे त्यांचं काम असून जाणून घेणं आपलं काम आहे. 

बाबासाहेबांनी आज वयाची शंभरी गाठली आहे. पण, त्यांच्यात काहीही फरक पडलेला नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज आहे तसं आहे. वयामुळे शरीर जरा थकलेलं आहे. पण त्यांचं बोलणं, स्मरणशक्ती आणि संदर्भ देण्याची हातोटी पूर्वीसारखेच आहे. आणि ज्या ज्या वेळी मी बाबासाहेबांना भेटतो, त्या त्या वेळी इतिहासाचा पुन्हा नव्याने साक्षात्कार होतो असे गौरवोद्गार ठाकरे यांनी यावेळी काढले. 

राज ठाकरे यांनी सांगितला 'फडणवीस' नावाचा 'इतिहास' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. एखादा शब्द कुठून कसा तयार झाला, त्याचं उगमस्थान काय याबद्दलही माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी फडणवीस या आडनावाबद्दलही अनोखी माहिती दिली.

फडणवीस या आडनावाचं उदाहरण दिलं. या आडनावाचा उगम सांगताना राज ठाकरे म्हणाले, फडणवीस हे आडनाव फर्दनवीस या पर्शियन शब्दावरुन आलेलं आहे. फर्द म्हणजे कागद आणि नवीस म्हणजे लिहिणारा. कागदावर लिहिणारा म्हणजे फर्दनवीस. पण मग नंतर फडावर लिहिणं आलं. आणि म्हणून ते फडणवीस असं झालं. आडनावं अशी असतात.  या गोष्टी कुठून आल्या, कशा आल्या. आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये फार रस आहे.

 

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेBabasaheb Purandareबाबासाहेब पुरंदरेhistoryइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज