शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

टिळकांची ‘ती’ खंत आजही कायम : डॉ. नितीन करमळकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 18:00 IST

चांगले शिक्षक दुर्मीळ होत असल्याबाबत टिळकांनी अग्रलेख लिहिला होता.

ठळक मुद्दे‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे प्रकाशनइतर काही होता येत नाही, मग निदान शिक्षक तरी व्हा, अशा विचाराने तरूण शिक्षकी पेशाकडे

पुणे : ‘चांगले शिक्षक मिळणे दुर्मीळ झाल्याची खंत लोकमान्य टिळक यांनी व्यक्त केली होती. दुर्दैवाने हीच परिस्थिती आजही कायम आहे. आजही चांगले शिक्षक अभावानेच दिसतात. ’, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
उत्कर्ष प्रकाशनतर्फे डॉ. विश्वास मेहंदळे लिखित ‘अग्रलेखकार लोकमान्य टिळक’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी झाले. या वेळी प्रा. डॉ. करमळकर, ज्येष्ठ विधीज्ञ भास्करराव आव्हाड, सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रकाशक सु.वा. जोशी उपस्थित होते.
करमळकर म्हणाले,‘लोकमान्य टिळकांनी राजकारण, समाजकारण, शिक्षण, आरोग्य, कृषी अशा विविध विषयांवर अग्रलेख लिहिले. त्यांचे महत्त्व कालातीत आहे. ते विचार आजही लागू होतात. चांगले शिक्षक दुर्मीळ होत असल्याबाबत टिळकांनी अग्रलेख लिहिला होता. इतर काही होता येत नाही, मग निदान शिक्षक तरी व्हा, अशा विचाराने तरूण शिक्षकी पेशाकडे वळत आहेत. त्यामुळे शिक्षणक्षेत्राचे नुकसान होत आहे’, असे प्रा. डॉ. करमळकर म्हणाले.
डॉ. मुजूमदार म्हणाले, ‘पूर्वी शिक्षक हे समाजाचा नेते असत. सामाजिक जडणघडणीत शिक्षकी पेशाचे मोठे योगदान होते. आता अगदी विरूद्ध परिस्थिती आहे. रोजगाराभिमुख शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन, कौशल्यविकास, शैक्षणिक आदानप्रदान आदी बाबतीत लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आजही खरे ठरतात.’
अ‍ॅड. आव्हाड म्हणाले, ‘सध्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का, यापेक्षा जनतेचे डोके ठिकाणावर आहे का हे विचारण्याची गरज आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार नागरिकांनी वापरले तर लोकशाही सशक्त होईल.समाजात गुणग्राहकतेची गरज असून चांगले नेतृत्व निवडणेही गरजेचे आहे.’ 
‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय, राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नाही असे टिळकांचे अनेक अग्रलेख आजही तंतोतंत लागू पडतात. टिळक की आगरकर हा वाद ब-याचदा दिसतो. परंतु, समाजाच्या उन्नतीसाठी टिळक आणि आगरकर हे धोरण अधिक योग्य ठरेल’, असे मेहंदळे म्हणाले. 
सुधाकर जोशी यांनी प्रास्तविक केले. समीरण वाळवेकर यांनी सूत्रसंचालन केले.

टॅग्स :PuneपुणेLokmanya Tilakलोकमान्य टिळकS B Mujumdarशां. ब. मुजुमदारnitin karmalkarनितीन करमळकरTeacherशिक्षक