ताहेरभाई पूनावाला यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 04:07 IST2017-08-01T04:07:40+5:302017-08-01T04:07:40+5:30

सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ आणि माजी कोषाध्यक्ष असलेले ताहेरभाई पुनावाला (वय ९५) यांचे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास निधन

Tiharbhai Poonawala passes away | ताहेरभाई पूनावाला यांचे निधन

ताहेरभाई पूनावाला यांचे निधन

पुणे : सामाजिक कृतज्ञता निधीचे आधारस्तंभ आणि माजी कोषाध्यक्ष असलेले ताहेरभाई पुनावाला (वय ९५) यांचे सोमवारी रात्री नऊच्या सुमारास निधन झाले. ताहेरभाई विवेकवादी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते होते. सुधारणावादी बोहरा चळवळीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत ही विशेष उल्लेखनीय आहे. महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ते होते. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता.
त्यांच्या पार्थिवाचे देहदान मंगळवारी सकाळी दहा वाजता हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयात केले जाणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी आणि एक नात आहे.

Web Title: Tiharbhai Poonawala passes away