पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:51 IST2025-05-11T18:50:54+5:302025-05-11T18:51:23+5:30

बोलण्यात गुंतवून त्यांच्या बोटातील ५२ हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत पसार झाला आहे.

Three gold rings stolen by police | पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या

पोलिस असल्याचे सांगून सोन्याच्या तीन अंगठ्या पळविल्या

अवसरी :पोलिस असल्याचे सांगून व बनावट ओळखपत्र दाखवून रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला थांबवून त्यांच्या जवळील सोन्याच्या तीन अंगठ्या हातचलाखी करत चोरल्याची घटना दिनांक ९ मे रोजी सकाळी अकरा वाजता निरगुडसर गावच्या हद्दीत दातखीळे मला फाट्याजवळ घडली आहे. याप्रकरणी सुरेश दत्तात्रय कुलकर्णी यांनी पारगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सुरेश दत्तात्रय कुलकर्णी हे शिंगवे ता. आंबेगाव येथील रहिवासी असून दिनांक ९ रोजी ते निरगुडसर पारगाव रस्त्याने येत असताना दातखीळेमळा फाट्याजवळ अज्ञात व्यक्तीने त्यांची मोटरसायकल थांबवून मी पोलिस आहे, व पोलिस असल्याचे ओळखपत्र दाखवून त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या बोटातील ५२ हजार रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत पसार झाला आहे. याबाबत पारगाव पोलिस ठाण्यात अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस सबइन्स्पेक्टर भाऊसो लोकरे करीत आहे.

Web Title: Three gold rings stolen by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.