इंदापूरात एका रात्रीत तीन घरफोड्या; २ लाखांचा ऐवज लंपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2023 13:11 IST2023-08-13T13:10:25+5:302023-08-13T13:11:01+5:30

चोरटयांनी देवघराच्या पेटीतील पैसे, घराच्या हॉलमधील कपडेही सोडले नाही

Three burglaries in one night in Indapur 2 lakh instead of lumpas | इंदापूरात एका रात्रीत तीन घरफोड्या; २ लाखांचा ऐवज लंपास

इंदापूरात एका रात्रीत तीन घरफोड्या; २ लाखांचा ऐवज लंपास

इंदापूर : शहा गावच्या हद्दीतील महादेवनगर भागात शुक्रवारी (दि.११) रात्री तीन ठिकाणी घरफोडी होऊन दागिने, रोकड व कपडे असा २ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. शनिवारी रात्री अज्ञात चोरट्यांविरुध्दइंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संदीपान भगवान खबाले (रा. शहा महादेवनगर ता. इंदापूर) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात फिर्यादीसह परिसरातील नामदेव शिवदास खबाले, जितेंद्र लाला जाधव यांची घरफोडी झाल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीपान खबाले यांच्या गावात व रानात अशी दोन ठिकाणी घरे आहेत. शुक्रवारी रात्री गावातील घरात जेवण करुन ते  आपल्या पत्नीसह रानातील घरी आले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा अजिंक्य खबाले याने रानातील घरी येऊन, गावातील घरात चोरी झाल्याचे फिर्यादीस सांगितले. फिर्यादीने घरी आल्यानंतर पाहिले असता घरातील १ लाख १० हजार रुपये किंमतीचे साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, ६० हजार रुपये किंमतीचे २ तोळ्याचे सोन्याचे नेकलेस, २५ हजार रुपये किंमतीचे ७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे, १२ हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांना आढळले. या संदर्भात पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन आल्यानंतर नामदेव शिवदास खबाले यांचे देवघरातील पेटी व त्यामधील १० हजार रुपयांची रोकड, जितेंद्र लाला जाधव यांचे घराच्या हॉलमधील साडया व कपडे चोरीस गेल्याचे फिर्यादीस समजले, असे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Three burglaries in one night in Indapur 2 lakh instead of lumpas