बिबवेवाडीत वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 14:48 IST2018-08-20T14:45:06+5:302018-08-20T14:48:24+5:30

घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले़ तिच्यावर अत्याचार केले़.

threatening to kill fathers raped on minor girls in Bibweedwadi | बिबवेवाडीत वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

बिबवेवाडीत वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देयाप्रकरणी मुलीच्या आई पोलिसांकडे फिर्याद दाखल

पुणे : वडिलांना मारुन टाकण्याची धमकी देऊन बिबवेवाडी येथील १४ वर्षांच्या मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या तरुणाला बिबवेवाडीपोलिसांनी अटक केली आहे़. 
संदीप आनंदराव देवताळे (वय ४०, रा़ बिबवेवाडी) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी मुलीच्या आई पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे़. हा प्रकार देवताळे याच्या घरी १७ नोव्हेंबर २०१७ पासून वेळोवेळी घडला आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, संदीप देवताळे याच्या घरी कोणी नसताना त्याने या अल्पवयीन मुलीला खेळण्याचे निमित्त करुन घरी नेले़ तिच्यावर अत्याचार केले़. तू हे कोणाला काही सांगू नको नाही तर तुझ्या वडिलांना मारुन टाकेन अशी धमकी दिली़. त्यानंतर त्याने या मुलीला संपर्क करण्यासाठी स्वत:कडील मोबाईल व सिमकार्डही दिले़ व तू माझ्याशी फोनवर बोलली पाहिजे, अशी धमकी दिली़ व १०० रुपये दिले़. या प्रकारानंतर त्याने या मुलीला वेळोवेळी धमकी देऊन तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले़. ही बाब मुलीच्या आईला समजल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी संदीप देवताळे याला अटक केली आहे़. पोलीस उपनिरीक्षक एस़ एस़ सुतार अधिक तपास करीत आहेत़. 

Web Title: threatening to kill fathers raped on minor girls in Bibweedwadi