हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना आपण काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 16:25 IST2025-10-11T16:23:59+5:302025-10-11T16:25:14+5:30

सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात, मागणी करणे, टीका करणे विरोधकांचे कामच असते

Those who staged the Hambarda march should introspect on what they did while in power - Ajit Pawar | हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना आपण काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे - अजित पवार

हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी सत्तेत असताना आपण काय काम केले याचे आत्मपरीक्षण करावे - अजित पवार

पुणे : कोणत्याही आपत्तीच्या वेळी सरकार पाहणी करून, पंचनामे करून माहिती संकलित करते व त्यानुसार मदत करते. मात्र, जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्ष करत असतात. सरकारची मदत तुटपुंजी आहे, अशी टीका करतात, मागणी करणे, टीका करणे विरोधकांचे कामच असते. मात्र, सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता उध्दव ठाकरे यांच्यावर केली.

वडगांव येथील नवले लॉन्स येथे शनिवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये जनसंवाद कार्यक्रम झाला. तत्पूर्वी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाध साधला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या हंबरडा मोर्चा विषयी प्रश्न विचारल्यानंतर अजित पवार यांनी ठाकरे यांचे नाव न घेतला आत्मपरीक्षण करण्याची टीका केली. ते म्हणाले, राज्य सरकारने पूरग्रस्तांना व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांंना पैशाची व धान्याची मदत दिली आहे. जाहीर केलेल्या साडेतीनशे कोटीच्या पॅकेजचे पैसै दिवाळीपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मदतीसाठी केंद्राला पाठवलेल्या प्रस्तावात बदल करता येत नाही. त्यामुळे शेतीचे पंचनामे, रस्ते व पुलांचे नुकसान आदींची सर्व माहिती घेऊन त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला जाईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत अजित पवार म्हणाले, पाटील यांनी काय वक्तव्य केले मला माहिती नाही. ते बोलले असतील तर बळीराजा बद्दल असे बोलणे योग्य नाही. भेटल्यानंतर त्यांना मी योग्य त्या सूचना करीन. पुरंदर विमानतळाच्या प्रश्नावर पवार म्हणाले, तेथील जमिनींचा भाव वाढला, त्याला आम्ही काही करू शकत नाही. लॉजिस्टिकसह आम्हाला विमानतळासाठी सहा हजार एकर जमिन लागणार होती. मात्र, निधीमुळे दोन धावपट्ट्यांसाठी तीन हजार एकर जमिनीची गरज आहे, तीचे भूसंपादन करण्यात येणार आहे.

स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य 

स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात वेगवेगळी परिस्थिती असते. यापूर्वी आम्ही या निवडणुका कशा लढवायच्या याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य स्थानिक नेतेमंडळींना दिले होते. त्याच पद्धतीने यावेळीही स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वतंत्र असेल. मात्र, महापालिका निवडणुकीसाठी महायुतीचे नेते म्हणून मी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र बसून निर्णय घेऊ, असेही पवार यांनी स्पष्ट केले. तसेच आम्ही कायम बेरजेचे राजकारण करतो, त्यामुळे ज्यांची प्रतिमा चांगली आहे. ज्यांच्यावर दोन नंबरचे गुन्हे दाखल नाहीत, अशांना पक्षात प्रवेश दिला जाईल, असेही ते म्हणाले.

Web Title : सत्ता में काम की समीक्षा करें: अजित पवार ने उद्धव ठाकरे पर साधा निशाना

Web Summary : अजित पवार ने उद्धव ठाकरे के 'हंबरडा मोर्चा' की आलोचना करते हुए सत्ता में रहने के दौरान किए गए कार्यों पर आत्मचिंतन करने का आग्रह किया। उन्होंने किसानों को सरकारी सहायता पर प्रकाश डाला और दिवाली तक भुगतान का वादा किया। पवार ने हवाई अड्डे के लिए भूमि अधिग्रहण और स्थानीय चुनाव रणनीतियों पर भी बात की।

Web Title : Review your work in power: Ajit Pawar slams Uddhav Thackeray

Web Summary : Ajit Pawar criticized Uddhav Thackeray's 'Hambarda Morcha,' urging self-reflection on past actions while in power. He highlighted government aid to farmers and promised Diwali payouts. Pawar also discussed airport land acquisition and local election strategies, favoring candidates with clean images.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.