चाेरट्यांनी केली पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण ; घटना सीसीटिव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 19:01 IST2020-02-18T18:21:12+5:302020-02-18T19:01:34+5:30
बसमध्ये चाेरी करण्यासाठी आलेल्या चाेरट्यांनी बसच्या कंडक्टरला जबर मारहाण केल्याचा प्रकार समाेर आला आहे.

चाेरट्यांनी केली पीएमपीच्या कंडक्टरला मारहाण ; घटना सीसीटिव्हीत कैद
पुणे : जनवाडी ते शनिपार मार्गावरील पीएमपी बसच्या कंडक्टरला दाेन चाेरट्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समाेर आली आहे. चाेरट्यांनी जनवाडी बस थांब्यावर बसमध्ये शिरत कंडक्टरकडे पैशांची मागणी केली. कंडक्टरने नकार देताच चाेरट्यांनी त्यांना मारहाण केली. याप्रकरणी चतुःश्रृंगी पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जनवाडी ते शनिपार मार्गावर 14 फेब्रुवारी राेजी ही घटना घडली. जनवाडीच्या शेवटच्या स्थानकावर प्रवासी उतरल्यानंतर बसच्या समाेर दुचाकीवरुन दाेन चाेरटे आले. बस थांबवत ते आत आले. त्यांनी कंडक्टरकडे पैशांची मागणी केली. कंडक्टरने नकार देताच त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. चालकाने बस तात्काळ पाेलीस स्टेशनकडे वळवली. दरम्यान चाेरटे मारहाण करुन पळून गेले. हा सर्व प्रकार बसमध्ये असलेल्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पाेलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान या प्रकरणी स्वारगेट आगाराकडून पत्रक काढण्यात आले असून शनिपार ते निलज्याेतीच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत.