शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

मतदान यंत्रणेचे नियोजन नाही

By admin | Updated: January 26, 2017 00:59 IST

महापालिका निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान होईल, असे गृहीत धरून पुरेशी यंत्रणा नियोजित न करता पालिका निवडणुकीत कमी मतदान होईल

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान होईल, असे गृहीत धरून पुरेशी यंत्रणा नियोजित न करता पालिका निवडणुकीत कमी मतदान होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. एका मतदान केंद्रावर ४ पेक्षा अधिक यंत्रे असू शकतात, हे गृहीत धरून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम सुलभ व्हावे, या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे या यंत्रणेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या जाणकारांचे गाऱ्हाणे आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ आहे. मात्र, दिवसभरात कोणत्याही वेळी केंद्रावर रांगा लागण्याची, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एखाद्या केंद्रावर जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. प्रभाग पद्धतीमध्ये होणाऱ्या मतदानामध्ये एका मतदाराला चारही मते देणे आवश्यक आहे. चार मते दिल्यानंतरच कंट्रोल पॅलेट दुसऱ्या मतदारासाठी खुले होणार आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने कमी मते देणे, चुकीचे बटण दाबले जाणे, अशिक्षित मतदारांना मतदान कसे करावे याची माहिती देण्यामध्ये वेळ द्यावा लागणे, असे प्रकार होऊ शकतात. एका मतदान केंद्रावर मतदाराचे नाव यादीमध्ये पडताळून पाहणे, मतदार स्त्री-पुरुष असल्यास तशी नोंद करून तर्जनीला शाई लावणे, सर्व यंत्रांचे कंट्रोल युनिट नियंत्रित करणे आणि ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडते किंवा कसे हे पाहणे, अशा स्वरूपाचे मतदान यंत्रणा काम करते. एका मतदानासाठी साधारणत: ४० ते ५० सेकंद लागतात. मतदार ज्येष्ठवयीन असल्यास किंवा अशिक्षित असल्यास त्यापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे या यंत्रणेतील जाणकारांचे निरीक्षण आहे. कागदी मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पद्धत असताना एका केंद्रावर केंद्राध्यक्षासह ५ निवडणूक कर्मचारी असत. मतदान होईपर्यंत या कर्मचारी व अधिकाऱ्यांना जेवण करणे, नैसर्गिक विधीसाठी केंद्राबाहेर जाणे यांवर मोठी मर्यादा येते.