...तर भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:13 IST2025-07-04T14:12:59+5:302025-07-04T14:13:18+5:30

थोरले बाजीराव हे एकमेव सरसेनापती आहेत, ते एकही युद्ध हरले नाहीत

then no one will dare to touch India's borders Amit Shah | ...तर भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही - अमित शाह

...तर भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही - अमित शाह

पुणे : खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) येथे थोरले बाजीराव पेशवे यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी शाह यांनी  थोरले बाजीरावांच्या पराक्रमाचा लेखाजोगा आपल्या भाषणातून मांडला आहे. 17 व्या शतकात पुण्यातून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला असे त्यांनी यावेळी  सांगितले आहे. त्यांचा पराक्रमाचा अभ्यास केल्यास भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणीही हिंमत करणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. 

शाह म्हणाले,  आता मी पुण्यात उभा आहे. सर्वात आधी ज्यांनी गुलामीच्या काळरात्री आशेचा किरण दाखवला, हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवाजी महाराजांना मी प्रणाम करतो. पुण्याची भूमी एक प्रकारे स्वराज्याच्या संस्काराची उगमस्थान आहे. १७ व्या शतकात या ठिकाणाहून स्वराज्याचा आलेख, तंजावूरपासून अटक ते अटक पासून कटक पर्यंत आला” असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

२० वर्षात ४१ युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले

थोरले बाजीराव पेशवे हे २० वर्षात ४१ युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले. अशा वीर योद्धा चा पुतळा आज एनडिएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो. इंग्रजांच्यासमोर स्वराज्यासाठी लढण्याची वेळ आली, तेव्हा सर्वात आधी सिंहगर्जना टिळकांनी केली. वीर सावरकरांनी महाराष्ट्राच्या भूमीतून उदहारण घालून दिले. एक व्यक्ती देशासाठी काय करू शकतो हे सावरकरांनी दाखवलं. एनडीएची मूळ स्थापना झाली असेल, तेव्हा काय विचार केला असेल. तेव्हा वातावरण चांगलं होतं. म्हणून एनडीए बनवली आहे. पण इंग्रजांना माहीत नाही की या ठिकाणी येणारं शतकभर भारताच्या सुरक्षेचं स्थान होईल असं अमित शाह म्हणाले.

बाजीराव एकही युद्ध हरले नाहीत 

बाजीरावांचे पुतळे आपल्या संपूर्ण देशात आहेत. पण स्मारक बनवण्याची योग्य जागा ही एनडीएच आहे. श्रीमंत बाजीरावांच्या मूर्तीपासून प्रेरणा घेऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास करावा. त्यांच्या रणनितीचा आपण उपयोग केल्यास मला वाटतं अनेक वर्ष भारताच्या सीमेला स्पर्श करण्याची कोणी हिंमत करणार नाही. शाहू महाराजांनी बाजीराव पेशव्यांची निवड केली. ते एकही युद्ध हरले नाहीत. हा रेकॉर्ड कोणत्याच सेनापतीचा नाही. एका वर्षात दोन युद्ध होतात. त्याकाळी पावसाळ्यात चार महिने युद्ध होत नव्हती. म्हणजे 8 महिन्यात दोन युद्ध करून जिंकले. असे वीर सेनानी होते ते” अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्याच कौतुक केलं. “शिवाजी महाराजांनी स्वराज्याची कल्पना केली असेल तेव्हा भारताचा भूगोल. त्यावेळचा भारताच्या साम्राज्याचा इतिहास पाहिल्यावर १२ वर्षाच्या मुलाने काय विचार केला असेल याचा विचार करा” असं अमित शाह म्हणाले.

Web Title: then no one will dare to touch India's borders Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.