शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

लॉकडाऊनमध्ये 'त्यांचा' विवाहसोहळा होता रखडला शेवटी चंद्रकांत दादांनीच तो मुहूर्त जुळवुन आणला 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 5:43 PM

लग्न लागणार की नाही अशा विवंचनेत असलेल्या या जोडप्याच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आले धावून...

ठळक मुद्देसामाजिक कार्यकर्त्यांची झाली मदत; पोलिसांच्या परवानगीसह केली अन्य तयारी

पुणे : जानेवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला... एप्रिलमध्ये विवाहाची तारीख ठरली... अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आणि दोन वेळा विवाह पुढे ढकलावा लागला... लग्न लागणार की नाही अशा विवंचनेत असलेल्या या जोडप्याच्या मदतीला सामाजिक कार्यकर्ते धावून आले आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या दोघांचा मंगल परिणय घडवून आणला.गुलटेकडी येथील डायस प्लॉट वसाहतीमध्ये राहणाऱ्या प्रशांत सलगर (वय 28) आणि मार्केट यार्ड येथील प्रेमनगर वसाहतीमधील रेखा सोनटक्के (24) असे याजोडप्याचे नाव आहे. रविवारी त्यांनी लक्ष्मीनारायण सिनेमागृह चौकातील तक्षशिला बुद्धविहारामध्ये सहजीवनाची शपथ घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्थानिक नगरसेवक श्रीनाथ भिमाले, झोपडपट्टी आघाडी सरचिटणीस गणेश शेरला आदी उपस्थित होते. प्रशांत हा सजावटीची कामे करतो. तर, रेखा ही छोटी-मोठी कामे करते. जानेवारीमध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता. एप्रिलमध्ये त्यांचा विवाह होणार होता.त्याकरिता बिबवेवाडीतील एक मंगल कार्यालय नक्की करण्यात आले होते. परंतू, कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आणि त्यांचा विवाह रखडला.लॉक डाऊन उठेल या आशेने त्यांनी दोन वेळा विवाह पुढे ढकलला. परंतू,कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालल्याने त्यांच्या लग्नाच्या आशा मावळूलागल्या होत्या. विवाह होणार की नाही असा प्रश्न पडलेल्या कुटुंबियांची समस्या लक्षात घेऊन गणेश शेरला यांनी कुटुंंबाला अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न लावण्याचा सल्ला दिला. त्यांची समजूत काढली. गुलटेकडीएकता प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी विवाह लावण्याचे ठरविले. लग्नाचा दिवस ठरल्यानंतर पोलिसांच्या परवानगीसह अन्य तयारी करण्यात आली. दरम्यान,स्वारगेट परिसरात आलेल्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनानगरसेवक भिमाले व शेरला यांनी ही माहिती दिली. पाटील यांनी या लग्नालाउपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली.अगदी साध्या पद्धतीने या दोघांचा मंगल परिणय तक्षशिला बुद्ध विहारामध्ये पार पडला. या विवाहाला प्रशांतचा मोठा भाऊ, मुलीची आई, बुद्ध विहाराचेअध्यक्ष गणेश चव्हाण, सचिन खंडाळे, अमोल खंडाळे, भन्ते सुनील गायकवाडउपस्थित होते. पाटील यांच्या उपस्थितीमुळे दोन्ही कुटुंब भारावून गेलीहोती. प्रशांतने लग्नासाठी प्रयत्न केल्याने सर्वांचे आभार मानले.

टॅग्स :Puneपुणेchandrakant patilचंद्रकांत पाटीलmarriageलग्नCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस