Join us  

जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स आपला शेवटचा साखळी सामना घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज खेळत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 7:04 PM

Open in App

IPL 2024, MI vs LSG Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स आपला शेवटचा साखळी सामना घरच्या मैदानावर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध आज खेळत आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली यंदा Mumbai Indians ला सपशेल अपयश आले आहे. १३ सामन्यांत फक्त ४ विजय मिळवून ते ८ गुणांसह तालिकेत सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहेत. रोहित शर्माकडून नेतृत्वाची जबाबदारी काढून हार्दिककडे देण्याचा फ्रँचायझीचा निर्णय चाहत्यांना आवडला नव्हताच आणि त्याच्या तीव्र प्रतिक्रिया मैदानावर उमटल्या. हार्दिकलाही अपेक्षांवर खरे उतरता आले नाही आणि संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. किमान अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवण्याचा MI चा प्रयत्न असेल. LSG ने १३ सामन्यांत ६ विजय मिळवले आहेत आणि आजचा विजय त्यांना प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखणारा ठरू शकतो.

रोहितला आयपीएलमध्ये मुंबईकडून ५०० चौकार पूर्ण करण्यासाठी ७ चौकारांची गरज आहे. सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सकडून २९८६ धावा केल्या आहेत आणि आज १४ धावा करताच तो ३००० धावांचा टप्पा पार करेल.  हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सला प्रथम फलंदाजीला बोलावले. जसप्रीत बुमराहच्या जागी अर्जुन तेंडुलकरला संधी दिली गेली आहे. हार्दिक म्हणाला की, वानखेडेवर पाठलाग करणे नेहमीच चांगले असते आणि चेंडू बॅटवर छान येतो. आजच्या सामन्यात बुमराह नाही त्यामुळे अर्जुन तेंडुलकर खेळतोय, तिलक वर्मा दुखापतग्रस्त  आहे आणि डेव्हॉल्ड ब्रेव्हिसला संधी  दिली आहे. टीम डेव्हिडही बाहेर आहे.

आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप लक्षात घेता जसप्रीतला विश्रांती दिली गेली आहे. रोहित शर्मा आजही इम्पॅक्ट खेळाडू म्हणून संघासोबत आहे. 

मुंबई इंडियन्स - इशान किशन, नमन धीर, सूर्यकुमार यादव, डेवॉल्ड ब्रेव्हिस, हार्दिक पांड्या, नेहाल वढेरा, रोमारियो शेफर्ड, अंशूल कंबोज, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सजसप्रित बुमराहहार्दिक पांड्याअर्जुन तेंडुलकरलखनौ सुपर जायंट्स