शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
2
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
3
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
4
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
5
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
6
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
7
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
8
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
9
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
10
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
11
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
12
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
13
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
14
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
15
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
16
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
17
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
18
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
19
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
20
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका

Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 5:29 PM

Fact Check : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. मात्र हा व्हिडीओ दिशाभूल करणारा आहे.

Claim Review : राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत.
Claimed By : Twitter User
Fact Check : अर्धसत्य

Created By: NewscheckerTranslated By: ऑनलाइन लोकमत

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नरेंद्र मोदी 4 जून 2024 रोजी पंतप्रधान होणार आहेत असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

पोस्टचे अर्काइव्ह येथे पाहता येईल.

न्यूजचेकरला WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा मिळाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचा Google रिव्हर्स इमेज सर्च केला. याच दरम्यान, आज तक द्वारे 10 मे 2024 रोजी पोस्ट केलेल्या यूट्यूब शॉर्टमध्ये व्हायरल क्लिपसारखी दृश्ये दिसली. आजतकने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल गांधींनी "नरेंद्र मोदी हिंदुस्तान का प्रधानमंत्री नहीं बन सकता है" असं म्हटलं आहे. कानपूरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधींनी हे विधान केल्याचं व्हिडिओसोबत सांगण्यात आलं आहे.

Courtesy: Aaj Tak

कानपूरमध्ये झालेल्या राहुल गांधींच्या रॅलीचा व्हिडिओ आम्ही शोधला. आम्हाला 10 मे 2024 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिकृत YouTube चॅनेलवर लाइव्ह स्ट्रीम केलेला व्हिडीओ सापडला. व्हिडिओमध्ये 46:04 मिनिटांनी, आम्हाला व्हायरल क्लिपचा भाग पाहायला मिळतो. पण लाइव्ह स्ट्रीम व्हिडिओमध्ये "4 जून 2024... नरेंद्र मोदी हिन्दुस्तान के प्रधानमन्त्री नहीं रहेंगे! आप लिख के ले लो … आप लिख के ले लो… नरेंद्र मोदी जी हिन्दुस्तान के प्रधानमन्त्री नहीं बन सकते हैं! हमने जो करना था … जो काम … जो मेहनत करनी थी … वो कर दी है… अब आप देखना उत्तर प्रदेश में हमारे गठबंधन को 50 से कम एक सीट नहीं मिलने वाली है।…" असं राहुल गांधी म्हणताना दिसत आहेत. 

व्हायरल क्लिप एडिट करून राहुल गांधींचं विधान बदलण्यात आलं आहे. "4 जून 2024... नरेंद्र मोदी हिन्दुस्तान के प्रधानमन्त्री नहीं रहेंगे!" मधून ‘नहीं’ हा शब्द हटवला आहे आणि "अब आप देखना उत्तर प्रदेश में हमारे गठबंधन को 50 से कम एक सीट नहीं मिलने वाली है" मधून ’50 से कम’ हटविण्यात आलं आहे.

Courtesy: Indian National Congress

टाइम्स ऑफ इंडियाने 10 मे 2024 रोजी राहुल गांधींच्या या रॅलीचं वृत्त दिलं होतं. ‘Rahul Gandhi Says ‘Good Bye’ To Modi; Says He Can’t Be India’s PM I Congress Kanpur Rally’ असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. रिपोर्टसोबत राहुल गांधी यांच्या भाषणाची क्लिपसुद्धा शेयर करण्यात आली आहे. ज्यामुळे हे स्पष्ट होतं की व्हायरल व्हिडीओ एडिटेड आहे.

तपासादरम्यान आम्हाला आढळून आलं की, राहुल गांधींचा हा व्हायरल व्हिडीओ एडिट करण्यात आला आहे.

Result: Altered Photo/Video

SourcesLive stream posted on the official You tube channel of Indian National Congress on 10th May 2024.Report by Aaj Tak on 10th May 2024.Report by Times of India on 10th May 2024.

(सदर फॅक्ट चेक Newschecker या वेबसाइटने प्रसिद्ध केलं आहे. 'शक्ती कलेक्टिव्ह'चा भाग म्हणून 'लोकमत डॉट कॉम'ने त्याचा अनुवाद केला आहे.) 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४