शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

गुरुवार पेठेत ज्वेलर्स शॉपमध्ये चोरी; ६८ लाखांचा ऐवज लंपास, सुरक्षारक्षक नसल्याने चोरांचे फावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 09:46 IST

जुन्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी असलेल्या ज्वेलरी शॉपला एकही सुरक्षारक्षक नाही

पुणे : गुरुवार पेठेतील एका ज्वेलर्स शॉपवर रविवारी चोरांनी डल्ला मारला. चोरांनीचांदीचे होलसेल दुकान असलेल्या शॉपमधून ६७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी ज्वेलर्स शॉपचे मालक विनोद परमार (४१, रा. मुकुंदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १४) मध्यरात्री चोरांनी गुरुवार पेठ, फूलवाला चौक येथील माणिक ज्वेलर्स या दुकानात चोरी केली. चोर करण्यासाठी पायी आल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. अर्धा तास चोर ज्वेलर्स शॉपमध्ये होते. 

व्यावसायिक चांदीचे होलसेल व्यापारी असल्याने मोठ्या प्रमाणात चांदीचे दागिने शॉपमध्ये होते. चोरांनी ४० लाख रुपयांचे ४५ किलो वजनाचे चांदीचे पैंजण, १३ लाख ५० हजार रुपयांचे १५ किलो वजनाचे हातातील कडे, चेन, ब्रेसलेट, मासोळी, चांदीचे कॉइन, ९ लाख रुपये किमतीचे १० किलो वजनाचे गणपती, लक्ष्मी, स्वामी समर्थ, गजानन महाराज यांच्या चांदीच्या मूर्ती, ५ लाख रुपये रोख आणि १० हजारांचा डीव्हीआर असा ६७ लाख ६० रुपये किमतीचा ऐवज गोणीत टाकून चोरून नेला. खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अर्जुन कुदळे पुढील तपास करतआहेत. चोरीच्या घटनेनंतर डीसीपी संभाजी कदम, एसीपी अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी जात माहिती घेतली.

सुरक्षारक्षक नाही..

जुन्या आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी असलेल्या ज्वेलरी शॉपला एकही सुरक्षारक्षक नाही. शॉपचा लाकडी दरवाजा आणि जाळीचे शटर कटावणीच्या सहाय्याने तोडून ३ चोर दुकानात शिरले. त्यानंतर अर्ध्या तासानंतर पाठीवर गोणीत चोरीचा माल घेऊन पायी जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत आहेत. ज्वेलरी शॉपच्या समोरच असलेल्या एका इमारतीत ज्वेलरी शॉपमधील कर्मचारी राहतात. सोमवारी (दि. १५) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यातील एका कर्मचाऱ्याला दुकानाचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले, त्यामुळे दुकानात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.

टॅग्स :Puneपुणेguruwar pethगुरूवार पेठjewelleryदागिनेThiefचोरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीGoldसोनंSilverचांदीMONEYपैसा