गतिरोधकावरून गाडी व्हायबल झाली; दुचाकीस्वाराचा एसटीच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:35 IST2025-10-07T11:33:34+5:302025-10-07T11:35:58+5:30
गाडीचा आरसा एसटीच्या मागील बाजूस घासल्याने तो मागच्या चाकाखाली आला. मात्र त्याच्या गाडीला काही झाले नाही

गतिरोधकावरून गाडी व्हायबल झाली; दुचाकीस्वाराचा एसटीच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू
हडपसर: सासवड रस्त्यावर भेकराईनगर हुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराचा सातववाडी येथे एसटीच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. युवक एका कंपनीत ड्युटीवर जाताना हा अपघात सकाळी 6.15 ला झाला.
दिनेश शिरसाट असे या युवकाचे नाव असून बीएनवाय मिलन या कंपनीमध्ये कामाला होता. एसटी च्या मागून येत असताना गतिरोधकावर गाडी व्हायबल झाली. गाडीचा आरसा एस टी च्या मागील बाजूस घासल्याने तो मागील चाकाखाली आला. त्याच्या गाडीला काहीही झाले नाही. मात्र तो चाकाखाली आल्याचे असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्याच्या जवळ लॅपटॉप व सात हजार रोखड होती. हि पोलिसांच्या ताब्यात दिली असल्याचे माजी नगरसेवक सुनील बनकर यांनी सांगितले. याठिकाणी आतापर्यंत अनेक बळी गेले असून या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीस्वारासह पादचाऱ्यांना हा रस्ता आता मृत्यूचा सापळा बनला आहे.