शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

By भाग्यश्री गिलडा | Updated: January 14, 2024 17:37 IST2024-01-14T17:37:33+5:302024-01-14T17:37:57+5:30

शिक्षकावर माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

The teacher molested the minor student | शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

शिक्षकानेच केला अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

पुणे : अल्पवयीन विद्यार्थिनीला सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ पाठवून शिक्षकानेच विनयभंग केल्याचप्रकार समोर आला आहे. शुभम विश्राम नाईक (वय- २७, रा. स्वारगेट) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.  

अधिक माहितीनुसार, हा प्रकार १२ मे २०२३ ते १६ नोव्हेंबर २०१३ यादरम्यान घडला. शुभम हा फिर्यादी मुलीच्या शाळेत स्पोर्ट शिक्षक म्हणून कामाला होता. फिर्यादी मुलीसोबत तिच्या वर्गातील इतर काही मुलींना त्याने इंस्टाग्रामवर संपर्क साधला. त्यानंतर संवाद वाढवत अश्लील फोटो आणि व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली. शाळेतील इतर शिक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी मुलीला तक्रार देण्याचा सल्ला दिला. याप्रकरणी शनिवारी (दि. १३) अल्पवयीन मुलीने चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनुसार शुभम नाईक याच्यावर माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला १७ जानेवारी २०२४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले आहे.

Web Title: The teacher molested the minor student