SSC Result 2025: राज्यात इंग्रजी माध्यमाचा टक्का ९८.४४; मराठी ९२.८५ टक्के अन् हिंदी ९० टक्के
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 16:54 IST2025-05-13T16:54:11+5:302025-05-13T16:54:48+5:30
राज्यात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा निकाल ९२.८५ टक्के तर त्यापेक्षा ६ टक्क्यांहून अधिक निकाल इंग्रजी माध्यमाचा सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे

SSC Result 2025: राज्यात इंग्रजी माध्यमाचा टक्का ९८.४४; मराठी ९२.८५ टक्के अन् हिंदी ९० टक्के
पुणे : राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात राज्यात मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा निकाल ९२.८५ टक्के लागला आहे. त्यापेक्षा ६ टक्क्यांहून अधिक निकाल इंग्रजी माध्यमाचा अर्थात सर्वाधिक ९८.४४ टक्के लागला आहे.
१. मराठी माध्यमातून १६ हजार ५३४ शाळांमधून १० लाख ७६ हजार ४३१ विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १० लाख ६६ हजार ९०० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यातील ९ लाख ९० हजार ६१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, याचा टक्का ८२.८५ टक्के इतका आहे.
२. इंग्रजी माध्यमाच्या ४ हजार ३१९ शाळांतून ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ३ लाख ५१ हजार ९५९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३ लाख ४५ हजार ९६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. याचा टक्का ९८.४४ टक्के इतका आहे.
३. हिंदी माध्यमाचा निकाल ९०.४८ टक्के लागला. ६१२ शाळांतून नोंदणी केलेल्या ३७ हजार २५ विद्यार्थ्यांपैकी ३६ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ३३ हजार १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
४. उर्दू माध्यमाच्या १ हजार ३०४ शाळांतून ८८ हजार ५२३ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील परीक्षा दिलेल्या ८७ हजार ७७३ विद्यार्थ्यांपैकी ८१ हजार १४९ विद्यार्थी (९३.५९ टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
५. कन्नड माध्यमाच्या ७८ शाळांतील २ हजार ६१४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. परीक्षा दिलेल्या २ हजार ५४६ विद्यार्थ्यांपैकी ९१.५२ टक्के, २ हजार ३३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
६. गुजराती माध्यमाच्या ४६ शाळांतून नोंदणी केलेल्या १ हजार ३१६ विद्यार्थ्यांपैकी १ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर १ हजार २२२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. याचा निकाल ९४.४४ टक्के लागला.
७. तेलुगू माध्यमाचे ९६.०९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात पाच शाळांतून नोंदणी केलेल्या १२९ विद्यार्थ्यांपैकी १२८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली हाेती. त्यातील १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
८. सिंधी माध्यमाचा निकाल ८२.६१ टक्के लागला. एका शाळेतून परीक्षा दिलेल्या २३ विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.