शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
3
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
4
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
5
Video: ‘मी महाराष्ट्र सोडून जाऊ का?’ नाना पाटेकर भावुक
6
शिंदेसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजप करणार उमेदवारीसाठी दावा; विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
7
Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
8
Twisha Sharma : "दीदी, या मला २४ तास कंट्रोल करतात"; मृत्यूच्या अवघ्या १० मिनिटांपूर्वी ट्विशाने पाठवला होता मेसेज!
9
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
10
१ जूनपासून महिलांच्या खात्यावर येणार ३ हजार ; प. बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनपूर्तीचा धडाका
11
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
12
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
13
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
14
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
15
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
16
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
17
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
18
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
19
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
20
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम सराटी येथे संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 22:56 IST

 या दरम्यान सर्व  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या  ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क बावडा : श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा इंदापूरहून (दि. 30 जून ) निघाला व विठ्ठलवाडी, वडापुरी, सुरवड,वकीलवस्ती, बावडा या गावाहून सायंकाळी इंदापूर ते सराटी 25 किमी प्रवास करून पुणे जिल्हातील  शेवटच्या मुक्कामासाठी  निरा नदी किनारी वसलेल्या सराटी (ता. इंदापूर जि.पुणे ) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीत  विसवला.

 या दरम्यान सर्व  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्यावतीने पालखी थांबणाऱ्या  ठिकाणी रांगोळ्यांनी सजावट केली . तसेच ठीक ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत करण्यात आले. संत तुकाराम महाराज पालखी विश्वस्त यांचाही सन्मान या गावांमध्ये करण्यात आला.

सराटी गावात पालखी सोहळा आल्यानंतर  गावाच्या ईशीवर  गावातील ग्रामस्थ रथातुन पालखी खांद्यावर घेऊन मुक्काम  स्थळापर्यंत टाळ मृदुंगाच्या निनादांमध्ये  आणल्यानंतर  सर्व दिंड्यांचे विणेकरी, झेंडेकरी, तुळशीवृंदावन डोक्यावर घेतलेल्या महिला, पखवाजवादक, चोपदार टाळकरी तसेच  पुणे जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,हनुमंत कोकाटे,उपसरपंच संतोष कोकाटे, सरपंच प्रतिनिधी समीर तांबोळी, काकासाहेब जगदाळे, रोहित जगदाळे, सुधीर कोकाटे, ज्ञानदेव कोकाटे,बापूसाहेब कोकाटे,विक्रम कोकाटे, रघुनाथ कोकाटे,बाबासाहेब कोकाटे, राजेंद्र कुरळे, सुरेश कोकाटे, अतुल भोसले,संत तुकाराम महाराज पालखी  सोहळा  अध्यक्ष जालिंदर मोरे, सोहळा प्रमुख दिलीप मोरे, वैभव मोरे,गणेश मोरे, विश्वस्त विक्रम मोरे,नंदकुमार मोरे, माजी अध्यक्ष बापूसाहेब देहूकर, पुरुषोत्तम  मोरे व इतर विश्वस्त,इंदापूर तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी, सराटी गावातील ग्रामस्थ यांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी महाआरती संपन्न झाली.

सराटी येथे पालखी मुक्काम स्थळी थांबल्यानंतर नीरा नदीच्या किनारालगत असणाऱ्या गावातील भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी उपस्थित होते.
पालखीच्या मुक्काम स्थळी वारकऱ्यांसाठी जर्मन तंबूची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे पाऊस वाऱ्यापासून भाविकांचे संरक्षण होणार आहे.
पालखी मुक्काम स्थळी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस बंदोबस्त चोख करण्यात आल्याचे दिसून येत आहे.
 

टॅग्स :PuneपुणेvarkariवारकरीPandharpurपंढरपूर