निर्दयीपणाचा कळस! महिलेच्या डोक्यात दगड घालून खून, पुरंदरमधील भयंकर घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 12:07 PM2023-05-16T12:07:53+5:302023-05-16T12:08:26+5:30

गावातील तलावाजवळ अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जीवे ठार मारले

The height of cruelty Woman stoned to death terrible incident in Purandar | निर्दयीपणाचा कळस! महिलेच्या डोक्यात दगड घालून खून, पुरंदरमधील भयंकर घटना

निर्दयीपणाचा कळस! महिलेच्या डोक्यात दगड घालून खून, पुरंदरमधील भयंकर घटना

googlenewsNext

पुरंदर : नीरा नजिकच्या थोपटेवाडी गावचे हद्दीत एका महिलेचा डोक्यात दगड घालून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मोकळ्या माळरानात अज्ञात व्यक्तीने सासूच्या डोक्यात दगड घालून ठार मारल्याची फिर्याद जावयाने जेजुरी पोलिसांत दाखल केली आहे. 

संगिता शरद करे (वय ५० वर्षे) रा. कापडगाव ता. फलटण जि. सातारा असे मृत महिलेचे नाव असून जावई गोपीनाथ जगन्नाथ बरकडे (वय २८ वर्षे) धंदा शेती रा. पिसुर्टी ता पुरंदर जि.पुणे यांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार दि.१५ रोजीचे सायंकाळी ७:३० च्या पुर्वी मौजे थोपटेवाडी गावचे हदीत पाझर तलावाजवळ  ता. पुरंदर जि.पुणे येथे फिर्यादी बरकडे यांच्या सासू संगिता शरद करे यांना कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणास्तव त्यांच्या डोक्यात दगड मारून त्यांना जीवे ठार मारले आहे. याबाबत मंगळवारी पहाटे १२:३९ वाजता गुन्हा दाखल झाला आहे. नीरा पोलीस दुरक्षेत्राच्या पोलिसांसह जेजुरी व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेटी दिल्या असून पुढील तपास जेजुरी पोलीस स्टेशनचे पो.नि. तावलकर सो. करित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Web Title: The height of cruelty Woman stoned to death terrible incident in Purandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.