मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 04:58 PM2023-08-13T16:58:48+5:302023-08-13T17:00:18+5:30

जीवे मारण्याची धमकी दिल्याने मुलीने तक्रार करण्याचे धाडस केले नव्हते

The event that blackened the relationship! Repeated abuse of daughter by murderous father | मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार

मंचरमध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना! नराधम पित्याकडून मुलीवर वारंवार अत्याचार

googlenewsNext

मंचर:वडील व मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात घडली आहे. एका नराधम पित्याने स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला असून या पित्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात राहणारी सदर अल्पवयीन मुलगी अकरावीत शिकते. तिच्या आईचा मृत्यू झाला असून 42 वर्षाचे वडील शेती करतात. घरी एकटीच मुलगी असल्याचे पाहून वडिलांनी मे 2023 ते 17 जुलै 23 पर्यंत या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केला. घरात कोणी नसताना राहते घरात व घरालगाच्या मोकळ्या जागेत नेऊन चाकूने जीवे मारण्याची धमकी देऊन वडिलांनी मुलीवर वारंवार बलात्कार केला आहे. घाबरलेल्या मुलीने सुरुवातीला इतरांना ही गोष्ट सांगितली नाही. मात्र धाडस करत तिने ही गोष्ट मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीच्या नातेवाईकांनी पारगाव पोलीस ठाण्यात येऊन पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर या अल्पवयीन मुलीने पोलिसांपुढे येवून आपबिती कथन केली. 

महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल गुरव यांनी या मुलीशी संवाद साधला. पोलिसांनी या नराधम पित्याला जेरबंद केले असून पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत. यासंदर्भात पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने संताप व्यक्त केला जात आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे करत आहेत.

Web Title: The event that blackened the relationship! Repeated abuse of daughter by murderous father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.