शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून राज्यभर गदारोळ; सध्या बाजारात प्रचंड मागणी, जोरदार विक्री सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 18:27 IST

वादामुळे तरी लोकं पुस्तक वाचायला सुरुवात करत आहेत, ही वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.

पुणे : सध्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावरून राज्यभरात गदारोळ सुरू आहे. आमदार संजय गायकवाड यांनी या नावावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर या पुस्तकाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. परिणामी सोशल मीडियावर त्याचे ‘पीडीएफ’ वेगाने वाचले जात आहे. तर पुस्तकाच्या दुकानातूनही त्याची विक्री जोरदार होत आहे. वादामुळे तरी लोकं पुस्तक वाचायला सुरुवात करत आहेत, ही वाचनसंस्कृतीच्या दृष्टीने सकारात्मक बाब आहे.

एखाद्या पुस्तकावरून वाद झाला की, त्याची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. परंतु, सध्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून बराच वादंग सुरू असल्याने त्या पुस्तकाची मागणीही वाढली आहे. ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे यांनी ‘शिवाजी कोण होता?’ ही पुस्तिका लिहिली आहे. त्याची सव्वाशेहून अधिक आवृत्त्या आल्या. खरं तर हे पुस्तक नव्हेच ती एक छोटेखानी, अवघ्या ७४ पानांची पुस्तिका आहे. पण त्या पुस्तकातून पानसरे यांनी छत्रपती शिवरायांचं व्यक्तिमत्त्व उभं केलं आहे. पानसरे यांनी सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे. दरम्यान, बुकगंगावर देखील पुस्तक उपलब्ध आहे. त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर लोक कमेंट करत आहेत. इतर अनेक ऑनलाइन संकेतस्थळावरूनही या पुस्तकाची विक्री होत आहे.

लाखो प्रतींची विक्री 

पहिली आवृत्ती १९८८ मध्ये प्रकाशित झाली. त्यानंतर १२५ हून अधिक आवृत्त्या आल्या आहेत. सुरुवातीला एका महिन्यात ३ हजार प्रती संपल्या होत्या. त्यानंतर सातत्याने ३ हजार किंवा ५ हजारांची आवृत्ती प्रकाशित झाली आणि त्या हातोहात खपल्या. सुरुवातीला पुस्तिकेची किंमत ५ रुपये होती. त्यानंतर हळूहळू वाढविण्यात आली. आता देखील नवीन आवृत्तीसाठी प्रकाशकांनी ऑर्डर दिली आहे.

‘पीडीएफ’ प्रचंड शेअर 

सोशल मीडियावर तर विविध शिवप्रेमी ग्रुपवरून पुस्तकाच्या पीडीएफ शेअर केल्या जात आहेत. ज्यांना पीडीएफ हवे त्यांनी मोबाईल नंबर पाठवावा, असे आवाहनही केले जात आहे. या पुस्तकामुळे अनेक ग्रुपवर पीडीएफ टाकता येत नाही. परिणामी वाचकांनी कोणाला मोबाईल नंबर टाका आणि पीडीएफ घ्या, असा मार्ग शोधला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Controversy Sparks High Demand and Sales for 'Shivaji Kon Hota?' Book

Web Summary : Debate over 'Shivaji Kon Hota?' boosts book sales. Govind Pansare's booklet, exploring Shivaji's inclusive kingship, sees surging demand. PDF versions circulate widely, fueling readership amid controversy.
टॅग्स :PuneपुणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजGovind Pansareगोविंद पानसरेliteratureसाहित्यEducationशिक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारSanjay Gaikwadसंजय गायकवाडEknath Shindeएकनाथ शिंदे