दुचाकीला धक्का लागला अन् चक्क कारच पळवून नेली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 12:38 IST2023-10-27T12:38:04+5:302023-10-27T12:38:17+5:30

चालकाने कार थांबवत काही लागले आहे का? अशी विचारणा केली. या वेळी दुचाकीस्वारांनी सदर कारच पळवून नेली

The bike was hit and the car was carried away | दुचाकीला धक्का लागला अन् चक्क कारच पळवून नेली

दुचाकीला धक्का लागला अन् चक्क कारच पळवून नेली

पुणे: बाणेर रस्ता येथील संचार भवन परिसरात एका कारचा धक्का लागून दुचाकीवरील मुलगा आणि मुलगी रस्त्यावर पडले. त्यानंतर चालकाने कार थांबवत काही लागले आहे का? अशी विचारणा केली. या वेळी दुचाकीस्वारांनी सदर कारच पळवून नेली. याप्रकरणी तुषार सुनील कोळेकर (२१, रा. लोणी काळभोर) याने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, एमएच १२ आर झेड ८०४३ या दुचाकीवरील मुलगा आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, तुषार कोळेकर हे त्यांच्या कारमधून बाणेर रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांच्या कारचा धक्का दुचाकीस लागला, त्यामुळे गाडीवरील मुलगा व मुलगी खाली पडले. तेव्हा कोळेकर यांनी कार थांबवली आणि त्यांना काही लागले आहे का? अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपींनी त्यांची कॉलर पकडून ठेवली. दुसऱ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोळेकर यांच्या गाडीची चावी घेत चारचाकी पळवून नेली. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.

Web Title: The bike was hit and the car was carried away