बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही; चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 15:19 IST2025-07-15T15:18:52+5:302025-07-15T15:19:08+5:30
हिरमोड झालेल्या चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही म्हणून बँंकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून पोबारा केला

बँंक फोडली मात्र तिजोरी फुटलीच नाही; चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही
पुणे : दोन चोरट्यांनाचोरी करण्याच्या उद्देशाने बँकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून बँकेत प्रवेश केला खरे. मात्र, बँंकेची तिजोरी फुटलीच नाही. त्यामुळे हिरमोड झालेल्या चोरट्यांनी हाती काहीच लागले नाही म्हणून बँंकेतील कागदपत्र अस्ताव्यस्त फेकून पोबारा केल्याच्या घटना मांजरी खुर्द येथे घडली.
याप्रकरणी बँक व्यवस्थापक शुभम ब्रजकिशोर शर्मा (वय ३७) यांनी अज्ञात दोन चोरट्याविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी खुर्द येथील एका इमारतीमध्ये कॅनरा बँकेची शाखा आहे. बँक कुलूप लावून बंद असताना रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी तळमजल्यावरील बँकेच्या दरवाज्याचे कुलूप ताेडून बँकेत प्रवेश केला. चोरट्यांनी बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना तिजोरी फुटली नाही. त्यामुळे हिरमोड झालेल्या चोरट्यांनी बँकेतील कागदपत्रे फेकून पोबारा केला. बँकेत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँकेचे व्यवस्थापक शर्मा यांनी वाघोली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बँकेतील सीसीटीव्हीचे चित्रीकरण तपासले असून पोलीस हवालदार गोगे अधिक तपास करत आहेत.