TET Exam Scam | ‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरण; सुशील खोडवेकरांना जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 01:29 PM2022-04-23T13:29:13+5:302022-04-23T13:31:08+5:30

खोडवेकर यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश

tet exam scam case bail granted to sushil khodvekar pune latest news | TET Exam Scam | ‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरण; सुशील खोडवेकरांना जामीन मंजूर

TET Exam Scam | ‘टीईटी’ गैरव्यवहार प्रकरण; सुशील खोडवेकरांना जामीन मंजूर

Next

पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले सनदी अधिकारी, शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना शुक्रवारी जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून, तपासही पूर्ण झाल्याचे नमूद करून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. पत्रावळे यांनी खोडवेकर यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.

शिक्षक पात्रता परीक्षा २०१९-२० मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असताना शालेय शिक्षण विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर (वय ४३) गैरव्यवहार प्रकरणात सामील असल्याचे आढळून आले होेते. खोडवेकर यांनी या प्रकरणात अटकेत असलेला आरोपी शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर याच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र ठरविण्यासाठी पैसे घेतले, अशी माहिती शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी चौकशीत दिली होती. त्यानंतर याप्रकरणात २९ जानेवारी रोजी खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली होती.

खोडवेकर यांच्या वतीने ॲड. एस. के. जैन, ॲड. अमोल डांगे, ॲड. अमेय गोऱ्हे, ॲड. तन्मय गिरे यांनी बाजू मांडली. प्रथम माहिती अहवालात (एफआरआय) खोडवेकर यांचे नाव नाही. त्यांच्याकडून मोबाइल, पेनड्राइव्ह जप्त करण्यात आला होता. त्याशिवाय खोडवेकर यांच्याकडून अन्य काही साहित्य जप्त करण्यात आले नाही. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल झाले असून, खोडवेकर यांचा जामीन मंजूर करण्याची विनंती ॲड. एस. के. जैन आणि ॲड. अमोल डांगे यांनी युक्तिवादात केली. त्यानंतर खोडवेकर यांची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

Web Title: tet exam scam case bail granted to sushil khodvekar pune latest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.