TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 17:12 IST2025-10-03T17:12:39+5:302025-10-03T17:12:48+5:30

आता उमेदवारांना ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ ऑक्टोबर ते दि. ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळणार

TET Exam: Extension of application deadline for Teacher Eligibility Test | TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

TET Exam : शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे :महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे होणारी शिक्षक पात्रता परीक्षा ( टीईटी -२०२५) रविवारी (दि.२३) नोव्हेंबर रोजी होणार आहे. सदर परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदतपूर्वी दि. ३ ऑक्टोबरपर्यंत होती. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे अनेक उमेदवारांना अडचणी आल्याने अर्ज भरण्यासाठी अतिरिक्त कालावधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आता उमेदवारांना ऑनलाइन आवेदनपत्र भरण्यासाठी दि. ४ ऑक्टोबर ते दि. ९ ऑक्टोबर २०२५ रात्री ११.५९ वाजेपर्यंत मुदतवाढ मिळणार आहे. तसेच तांत्रिक कारणांमुळे परीक्षा शुल्क भरता न आलेल्या उमेदवारांनादेखील नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून दि. ९ ऑक्टोबर २०२५ पर्यंत शुल्क भरण्याची संधी दिली आहे. यानंतर कोणत्याही परिस्थितीत अतिरिक्त मुदतवाढ मिळणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज भरून शुल्क भरावे, असे आवाहन परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी केले.

Web Title : TET परीक्षा: शिक्षक पात्रता परीक्षा के लिए आवेदन की अंतिम तिथि बढ़ी

Web Summary : बाढ़ के कारण टीईटी-2025 आवेदन की अंतिम तिथि 9 अक्टूबर तक बढ़ाई गई। उम्मीदवार अब 9 अक्टूबर तक ऑनलाइन शुल्क का भुगतान कर सकते हैं। आगे कोई विस्तार नहीं मिलेगा।

Web Title : TET Exam: Application Deadline Extended for Teacher Eligibility Test

Web Summary : The TET-2025 application deadline extends to October 9th due to floods. Candidates can now pay fees online until October 9th. No further extensions will be granted.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.