घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 11:30 IST2025-06-28T11:30:06+5:302025-06-28T11:30:26+5:30

अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत असून या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Tempo hits girl while playing in front of house One and a half year old girl dies, driver absconding | घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार

घरासमोर खेळताना टेम्पोची धडक; दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू, चालक फरार

पुणे: घरासमोर खेळत असताना टेम्पोच्या धडकेत दीड वर्षाच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना खडकीतील सर्वत्र विहार भागात घडली. आईजा शेख असे मृत्युमुखी पडलेल्या बालिकेचे नाव आहे. याबाबत तिची आई झेबा शाहीन जाहिद शेख (वय २५, रा. सर्वत्र विहार, एम. ई. एस. काॅलनी, लेबर कॅम्पसमोरील रस्ता, खडकी) हिने खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

गुरुवारी आईजा शेख ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी तेथून निघालेल्या भरधाव टेम्पोच्या धडकेत तिचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या टेम्पाे चालकाचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पटेल पुढील तपास करत आहेत.

अपघातानंतर होताहेत फरार 

पुणे शहर आणि उपनगर भागात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. टेम्पो, ट्रकच्या धडकेत तरुण, ज्येष्ठ सर्वांना जीव गमवावा लागतोय. पादचाऱ्यांनाही रस्त्याने चालणे अवघड झाले आहे. आता तर जीव मुठीत धरूनच चालावे लागते आहे. अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळताहेत. चालक कोणाच्याही जीवाची परवा न करता वाहन चालवल्याचे आढळून येत आहे. तसेच अपघात झाल्यावर चालक फरार होण्याचीही प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

Web Title: Tempo hits girl while playing in front of house One and a half year old girl dies, driver absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.